पानीपत/कुरुक्षेत्र – हरियाणाच्या कुरुक्षेत्र जिल्ह्यात आज (बुधवार) सकाळी 9:30 वाजता रेल्वे रुळाजवळ 51 एमएमचे सात जिवंत मोर्टार बॉम्ब आढळून आलेत. त्यामुळे दिल्ली–अंबाला लोहमार्गावर तब्बल दोन तास ट्रेन धावल्या नाहीत.
दिल्ली-अंबाला लोहमार्गावर शाहाबाद स्टेशनपासून जवळपास 300 मीटर अंतरावर रेल्वे लाइनच्या बाजूला खेळत असलेल्या मुलांना हे बॉम्ब आढळले. त्यानंतर सर्व ट्रेन कुरुक्षेत्र आणि अंबालामध्येच थांबून ठेवण्यात आल्या. सेना आणि पोलिस दल आणि बॉम्ब निरोधी पथकाने घटनस्थळावर येत ते निकामी केले. सापडलेल्या बॉम्बचा वापर रॉकेट लॉन्चरमध्ये केला जातो. या ठिकाणी हे बॉम्ब कुठून आले याचा तपास सुरू आहे.
पुढील स्लाइडवर पाहा संबंधित फोटो