आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरनाथ यात्रेतील टूर ऑपरेटरने सांगितली आपबीती, मृतांमध्ये 5 गुजरात तर 2 महाराष्ट्रातील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओम ट्रॅव्हलचा मालक आणि टूर ऑपरेटर हर्ष देसाई. - Divya Marathi
ओम ट्रॅव्हलचा मालक आणि टूर ऑपरेटर हर्ष देसाई.
वलसाड /श्रीनगर - काश्मिरमध्ये दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेहून परत येणाऱ्या भाविकांच्या बसला सोमवारी रात्री 8.30 दरम्यान लक्ष्य केले. यात गुजरातमधील 5 तर महाराष्ट्रातील 2 महिलांचा मृत्यू झाला. गुजरातमधील वलसाड येथून हे भाविक अमरनाथ यात्रेसाठी गेले होते. हल्ल्यात टूर ऑपरेटर जखमी झाला असून त्याने आपबीती सांगितली आहे. 
 
काय म्हणाला टूर ऑपरेटर हर्ष देसाई 
- आम्ही श्रीनगरहून 6.30 वाजता निघालो. आमच्या तीन बस होत्या. दोन बस पुढे निघून गेल्या आमची बस 30-35 किलोमीटर मागे असताना अचानक तीन बाजूंनी बसवर अंदाधूंद गोळीबार सुरु झाला. आम्ही घाबरून सीटच्या खाली लपून बसलो. त्यावेळी फक्त गोळीबार आणि किंचाळण्याचे आवाज येत होते. काय करावे काहीच कळत नव्हते. तेवढ्यात दोन गोळ्या मला लागल्या एक पायाला तर दुसरी खांद्यात. त्यावेळी वाटले की हा आयुष्याचा शेवटचा दिवस आहे. आम्ही एवढे घाबरलेले होतो की हे किती वेळ सुरु होते हे देखील कळाले नाही. मग फायरिंगचा आवाज शांत झाला. आर्मीच्या जवानांनी आम्हाला श्रीनगरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मी आणि माझे वडील वाचलो होतो. 
(हर्ष देसाईने ज्या शब्दात 'भास्कर'च्या केतन राठोडला सांगितले ते जसेच्या तसे )
 
हल्ल्याच्या दोन थेअरी सांगतल्या जात आहे
#1 - हल्लेखोर बाइकने आले आणि बसवर हल्ला केला 

- हल्ला झालेली बस ही सुरक्षा ताफ्यापासून वेगळी होती. बाइकवर दहशतवादी आले आणि त्यांनी बसवर अंदाधूंद फायरिंग करुन घटनास्थळावरुन फरार झाले. 
#2 - दहशतवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकती बस आली 
- दहशतवादी बटेंगु येथे पोलिसांच्या जीपवर फायरिंग करत होते. ही चकमक सुरु असताना यात्रेकरुंनी भरलेली बस त्यांच्यामधे आली. त्यामुळे यात्रेकरु हल्ल्यात सापडले. 
 
काय आहे प्रकरण 
- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेहून परत येणाऱ्या बसवर बेछूट गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात 7 जण मृत्यूमुखी पडले आहे. 15 जण जखमी आहे. मृतांमध्ये 5 गुजरातचे तर 2 महिला या महाराष्ट्रातील पालघर येथील आहेत.
 
मृतांमध्ये दोन महाराष्ट्रातील 
- हल्यात महाराष्ट्रातील पालघर येथील निर्मलाबेन ठाकोर आणि उषा सोनकर यांचा मृतांमध्ये समावेश आहे. 
बातम्या आणखी आहेत...