आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 7 Feet Long Gurgaon Traffic Police Constable Rajesh Kumar Daily Eating 40 Eggs

हरियाणातील ट्रॅफिक हवालदार \'भीम महाबली\' रोज खातात 40 अंडी आणि 40 चपात्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- वाहतूक सुरक्षा सप्ताहात दुचाकी वाहनचालकांना हेल्मेट वापण्याचा सल्ला देताना ट्रॅफिक हवालदार राजेश कुमार ऊर्फ भीम महाबली)
अंबाला- गुरगावमध्ये एक ट्रॅफिक हवालदार त्याच्या उंचीवरून चर्चेत आला आहे. राजेश कुमार उर्फ भीम महाबली असे या हवालदाराचे नाव असून त्याची उंची 7.4 फुट आहे. सध्या भीम महाबली यांनी वाहतूक सुरक्षा सप्ताहात सहभाग घेतला आहे. दुचाकी चालकांना हेल्मेट वापरण्याचा सल्ला महाबली देताना दिसत आहेत. गुरगावमध्ये शनिवारपासून वाहतूक सुरक्षा सप्ताह सुरु झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 155 किलोग्रॅम वजन असलेले राजेश कुमार दोन-दोन तासांनंतर जेवण करतात. राजेश दिवसभरात 40 अंडी, 40 चपात्या, तीन किलोग्रॅम चिकन, पाच लिटर दूध आणि चार किलो फळे खातात. मात्र, एखाद्या दिवशी पूर्ण खुराक मिळाली नाही तर राजेश कुमार यांना भुकेल्या पोटी झोपावे लागते. मासिक वेतन आणि शेतीतून मिळणार्‍या उत्पन्नातून ते खाण्यापिण्यावर खर्च करतात. राजेश कुमार सकाळी सहा तास एक्सरसाइज करतात.

राजेश कुमार यांना आठ भावंडे आहेत. मात्र, सगळ्यांमध्ये राजेश कुमार हेच उंच आहेत. देशातील सर्वाधिक उंच असलेल्या व्यक्तींमध्ये राजेश कुमार यांचा तिसरा क्रमांक लागतो. ता पंजाब-हरियाणामध्ये राजेश कुमार सगळ्यात उंच व्यक्ती आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, ट्रॅफिक हवालदार राजेश कुमार यांची छायाचित्रे...