आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: ऑपरेशन करून सात फूट लांब सापाचे वाचवले प्राण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सापाचे ऑपरेशन करताना डॉ.सिरमोर - Divya Marathi
सापाचे ऑपरेशन करताना डॉ.सिरमोर
रायपूर/भिलाई- छत्तीसगडमध्ये वन्य प्राण्यांचे संरक्षण करणार्‍या नोव्हा नेचर क्लबने एका सात फूट लांब सापाचे ऑपरेशन करून त्याचे प्राण वाचवले. पुढील काही दिवसांतच हा साप बरा होईल. त्यानंतर त्याला जंगलात सोडण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. रॅट स्नेक प्रजातीचा हा साप आहे.
भिलाईचे नोव्हा नेचर क्लबचे अध्यक्ष सूरज राव यांनी सांगितले की, नेहरु नगरातून 4 जूनला एक फोन आला. एका घरात साप असल्याचे समजले. क्लबच स्नेक (साप) रेस्क्यू टीम नेहरु नगरमध्ये दाखल झाली. साप कुंपनात अडकला होता. तो जखमी झाल्याने अस्वस्थ झाला होता. कटरच्या मदतीने कुंपन कापून सापाला बाहेर काढण्यात आले. काटेरी तारांमुळे सापाचे पोट फाटले होते. जखमी सापाला तत्काळ भिलाई येथील वेटनरी चिकित्सक डॉ. सिरमोर यांनी सापावर ऑपरेशन केले.
सध्या साप डॉक्टरांच्या ऑब्जरवेशनमध्ये आहे. एक-दोन दिवसांत तो पूर्णपणे बरा होईल. त्यानंतर त्याला जंगलात सोडले जाईल, असे सूरज राव यांनी सांगितले.

भित्रा असतो रॅट स्नेक
सूरज राव यांनी सांगितले की, इंडियन रॅट स्नेक प्रजातीचा हा साप आहे. या धामण देखील म्हटले जाते. हा साप खूप भित्रा असतो. या सापाची लांबी 12 फूटापर्यंत असते.

यापूर्वी झाले होता 'किंग कोबरा'चे ऑपरेशन
नोवा नेचर क्लबने गेल्या नोव्हेंबरमध्ये एका जखमी किंग कोबरावर उपचार केले होते. त्याच्यावर ऑपरेशन करण्‍यात आले होते. तो बरा झाल्यानंतर त्याला जंगलात सोडण्यात आले होते. नोव्हा नेचर क्लबचे सदस्य राज्यातील अनेक भागात सक्रीय आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो