आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्तीसगड: नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत सात जवान शहीद, 10 जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगदलपूर - छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात गस्तीसाठी निघालेल्या जवानांच्या तुकडीवर शंभरपेक्षा जास्त नक्षलवाद्यांनी शनिवारी सकाळी दबा धरून अचानक हल्ला चढवला. यात सात जवान शहीद झाले. तर दहा जवान जखमी झाले. हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी जवानांची शस्त्रास्त्रे लुटून जंगलात पलायन केले. राज्यात या वर्षात झालेला हा आजवरचा सर्वात मोठा नक्षलवादी हल्ला आहे. जखमी १० जवानांपैकी सात जवानांना हेलिकॉप्टरने रायपूरला हलवण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सुकमा जिल्ह्यात दोरनापाल जिल्ह्यात एसटीएफची ५० जवानांची एक तुकडी प्लाटून कमांडर शंकरराव यांच्या नेतृत्वाखाली सकाळी गस्तीसाठी निघाली होती. सकाळी साडेदहाच्या सुमारास पिडमेल जैतावरम दरम्यान तुकडी गस्त घालत असताना दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक तुकडीवर हल्ला चढवला. त्यांनी जवानांना तिन्ही बाजूंनी वेढा घतला अंधाधूंद गोळीबार सुरू केला. तीन तासांपेक्षा जास्त वेळ नक्षलवादी गोळीबार करत होते. हल्ल्यात शंकर राव यांच्यासह सात जवान शहीद झाले. नक्षलवादी जवानांनी शस्त्रेही लुटून पळून गेले.

महिला नक्षलीही
जगदलपूरयेथे रुग्णालयात जखमी जवानांवर उपचार करण्यात येत आहेत. पैकी एका जवानाने सांगितले की, नक्षलवाद्यांची संख्या १०० पेक्षा जास्त होती. ते नव्या पोशाखात आले होते. त्यांच्यापैकी अनेकजण अल्पवयीन होते. हल्ला करणाऱ्यांमध्ये महिला नक्षलवादीदेखील होत्या. त्यांना पुढे करून हल्ला करण्यात आला.
फोटो - हल्ल्यात जखमी एसटीएफ जवान.