आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 7 Of 20 Shot Dead Were Picked Up From Bus By Police Witness News In Marathi.

चित्तूर एन्काउंटर: सात लोकांना बसमधून उतरवून पोलिसांनीच घातल्या गोळ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: आंध्र प्रदेशातील चित्तूर येथील चकमकीनंतर पडलेले मृतदेह)
चित्तूर/चेन्नई- आंध्र प्रदेशात चित्तूर जिल्ह्यात पोलिस चकमकीत मारल्या गेलेल्या 20 चंदन तस्करांचे 'एन्काउंटर प्रकरणी' अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. केंद्र सरकारने राज्य सरकारकडे या घटनेचा अहवाल मागितला असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, आंध्र प्रदेश पोलिसांनी सात लोकांना बसमधून खाली उतरवून त्यांच्यावर गोळ्या घातल्या होत्या, असे एका प्रत्यक्षदर्शीने म्हटले आहे. शेखर असे या व्यक्तीचे नाव आहे.
आंध्र प्रदेश पोलिसांनी चित्तूर जंगलात केलेल्या सर्च ऑपरेशनदरम्यान 20 जणांचा एन्काउंटर केला. पोलिसांनी या सगळ्यांना चंदन तस्कर संबोधले होते. परंतु, पोलिसांची ही चकमक बनावट असल्याचा दावा तामिळनाडू येथील रहिवासी शेखरने केला आहे. तिरुपतीमध्ये आंध्र प्रदेश पोलिसांनी सात लोकांना अटक केली होती. परंतु त्यांना बसमधून उतरवून त्यांच्यावर गोळ्या घातल्याचा दावाही शेखरने केला आहे. मारले गेलेले सगळे मजुर होते.

शेखरच्या एका नातेवाईकाने मीडियाला सांगितले की, तमिळनाडुतील तिरुवनमल्लाई जिल्ह्यातील वेटागिरीपलायम गावातील रहिवासी शेखर हा चित्तुर एनकाउंटरचा प्रत्यक्षदर्शी आहे. चकमक झाली त्या दिवशी शेखर जंगलातच होता. परंतु तो लवकर घरी आला होता. आंध्र प्रदेश पोलिसांनी एक बस थांबवून सात जणांवर गोळ्या घातल्या. शेखर देखील त्याच बसमध्ये होता. परंतु, तो एका महिलेच्या समोरील सीटवर बसला होता. त्यामुळे शेखरला पोलिसांनी खाली उतरवले नाही. पोलिसांना वाटले की, शेखर त्या महिलेचा पती आहे.

वेटागिरीपलायम गावातून सोमवारी दुपारी आठ लोक बाहेर पडले होते. परंतु फक्त शेखर एकटाचा परत आला. नंतर पोलिसांनी सातही जणांना चंदन तस्कर म्हणून संबोधले. विशेष म्हणजे सातही मजुरांचे फोटो प्रसिद्ध केले.
तिरुवनमल्लाई जिल्ह्याचे डीएसपी एन.मणी यांनी सांगितले की, पोलिसांची चकमक बनावट असल्याचा दाव्याची शहानिशा केली जाणार आहे. मात्र, शेखर घाबरला असून त्याला पोलिसांसमोर यायचे नाही. दरम्यान, पोलिसांवर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचे आंध्र प्रदेशचे डीजीपी जी.व्ही.रामुडू यांनी म्हटले आहे. पोलिसांनी स्वरक्षणासाठी गोळीबार केला.
पोलिसांनी प्रसिद्ध केले चंदन तस्करांचा व्हिडिओ फुटेज...
आंध्र प्रदेश सरकारने बुधवारी एक व्हिडिओ फुटेज प्रसिद्ध केला आहे. फुटेजमध्ये लाकूड तोडताना दिसत असलेले लोक चंदन तस्कर असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
दुसरीकडे, आंध्राचे सीपीआय लीडर जनार्दन यांनी सरकारचा हा व्हिडिओ खोटा असल्याचे म्हटले आहे. सरकारने प्रसिद्ध केलेला व्हिडिओ फुटेज चित्तूरचे नसून मामांदुर जंगलातील आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, चंदन तस्करांचे एन्काउंटर वादात, केंद्र सरकारने अहवाल मागवला....