आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: सरकारी पैशावर डल्ला मारणाऱ्या डीएमच्या पीएसह 7 जण अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सतीशचंद्र झा, प्रेम कुमार, राकेश झा - Divya Marathi
सतीशचंद्र झा, प्रेम कुमार, राकेश झा
भागलपूर/ पाटणा- ‘सृजन’ नावाच्या स्वयंसेवी संस्थेच्या घोटाळाप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा आणि जिल्हा पोलिसांच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी यात सहभागी असलेल्या ७ लोकांना अटक केली. या घोटाळ्यात भागलपूर जिल्हाधिकाऱ्यांचा स्वीय सहायक, स्टेनो, दोन नाजर आणि इंडियन बँकेचे अधिकारी व सृजनशी संबंधित पदाधिकारी सहभागी आहेत. 
 
कोतवाली पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या गुन्ह्यांत  या सर्वांना अटक करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणांचा सूत्रधार जिल्हाधिकाऱ्यांचा पीए प्रेमकुमार आहे. तो प्रशासन, बँक आणि सृजन यांच्यात समन्वयक म्हणून काम करत होता. प्रेमकुमार २००६ पासून या पदावर कार्यरत आहे. सात वर्षांपासून तो जिल्हाधिकारी कार्यालयात स्टेनो म्हणून कार्यरत आहे. या काळात त्याने कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमवली. पोलिसांनी प्रेमकुमारच्या शासकीय निवासस्थानी छापे घातले.  तेथून चल-अचल संपत्तीची कागदपत्रे आणि पासबुक जप्त करण्यात आले. त्याच्या निकटवर्तिंयांची चौकशी होऊ शकते. 

अधिकाऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज 
संस्था सरकार आणि प्रशासनास आपल्या पद्धतीने हाताळत होती. जिल्हाधिकारी कार्यालयात काम करणारे काही लोक पगार सरकारचा आणि काम सृजनसाठी करत होते. त्यांना आपल्या जाळ्यात कायम ओढण्यासाठी शून्य टक्के व्याजदराने सृजनने त्यांना कर्ज दिले होते,  तर इतर व्यावसायिकांना, नेत्यांना आणि इतरांना ८ ते १६ टक्के व्याजाने कर्ज दिले होते. 

४०० सरकारी सृजनचे ३६ खाते संशयास्पद 
आतापर्यंत सुमारे ४०० सरकारी खाते व सृजनचे तीन डझन खाते संशयास्पद आहेत. तपास पथक सर्व खात्यांची कसून चौकशी करत आहे. कोणत्या खात्यात किती रक्कम हस्तांतरित झाली समजलेले नाही.  

‘भास्कर’ने आधीच केला घोटाळ्याचा पर्दाफाश
 गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी जितेंद्रसिंह गंगवार यांनी सांगितले, गुन्ह्याचा ठोस पुरावा आमच्या हाती लागला आहे. भिखनपूर, त्रिमूर्ती चौकाजवळील प्रिंटिंग प्रेसचा मालक वंशीधर झा यास पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडील बँकेची पतप्रमाणपत्रे, स्टेटमेंट ऑफ अकाउंट, सरकारी पासबुके छापून ती अपडेट केली जायची. पासबुक कोअर बँकेच्या सॉफ्टवेअरमध्ये अपडेट करण्यात आलेली नव्हती. ते काम वंशीधर झा याच्या छापखान्यात होत असे.  तसेच बाहेरच्या लोकांना प्रिंट खाते, स्टेटमेंट नाझर यांना दिले जात असत. 

छत्तीसगड व एमपीच्या तीन आयएएसना घरी पाठवले
रायपूर, भोपाळ- केंद्र सरकारने मध्य प्रदेशातील एम. के. सिंह आणि छत्तीसगडमधील वरिष्ठ आयएएस अधिकारी अजयपाल सिंह आणि बाबूलाल अग्रवाल यांना सक्तीने सेवानिवृत्त केले. दोघेही राज्याच्या मुख्य सचिवपदावर कार्यरत होते. 
 
बी. एल. अग्रवाल :अग्रवाल १९८८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. आयकर विभागाच्या छाप्यात कोट्यवधींची बेहिशेबी संपत्ती सापडली आहे. 
अजयपाल सिंह : १९८६ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सिंह यांच्यावर पर्यटन विभागात मनमानीपणे भरती व खर्च केल्याचा आरोप आहे.
एम. के. सिंह : मध्य प्रदेशातील १९८५ बॅचचे एम. के. सिंह आयएएस आहेत. त्यांच्यावर कोट्यवधींची सरकारी जमीन लाटल्याचा आरोप अाहे. 
बातम्या आणखी आहेत...