आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवाद्यांना दिले जशास तसे प्रत्युत्तर, वाचा #pathankot च्या 7 हिरोंची कहानी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंजाबच्या पठाणकोटमध्ये सुरू असलेल्या दहशतवाद्यांच्या शोधमोहिमेने गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. भारतीय लष्करातील जवान जीवाची बाजी लावून संपूर्ण एअरफोर्स बेसमध्ये दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. या कारवाईमध्ये सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. मात्र त्याचवेळी भारताचे सात वीर जवानही या कारवाईदरम्यान शहीद झाले आहेत. या शहिदांची संपूर्ण कहानी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1. शहीद कर्नल ने म्हणाले, 'मी एका ऑपरेशन मध्ये आहे'
नाव - निरंजन ई. कुमार
पद - लेफ्टनंट कर्नल, एनएसजी
वय - 35 वर्षे
लेफ्टनंट कर्नल निरंजन ई. कुमार शहीद होण्याच्या एक दिवसआधीच वडिलांशी फोनवरून बोलले होते. त्यानंतर शहीद कर्नलचे वडिल शिवराजन ई. कुमार त्यांच्या दुसऱ्या कॉलची वाट पाहत होते. पण दुसऱ्या दिवशी त्यांना मिळालेल्या बातमीने संपूर्ण कुटुंबाला हादरा दिला. कर्नलचे वडिल शिवराजन म्हणाले, माझा मुलगा पठाणकोटमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात लढत आहे हे, मला माहिती नव्हते. निरंजनला लहानपणापासूनच आर्मीत जायचे होते. 35 वर्षांच्या निरंजनचा जन्म केरळमध्ये झाला होता. त्यानंतर त्यांचे कुटुंब बेंगळुरूला शिफ्ट झाले. त्यांच्या कुटुंबामझ्ये वडिल, भाऊ, पत्नी राधिका आणि 18 महिन्यांची मुलगी आहे.
असे शहीद झाले...
शहीद निरंजन कुमार यांची पोस्टींग दीड वर्षांपूर्वीच आर्मीमधून नॅशनल सेक्युरिटी गार्ड (NSG) मध्ये झाली होती. ते बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडमध्ये होते. रविवारी पठाणकोट एअरबेसमध्ये आयडी डिफ्यूज करताना ब्लास्ट झाला आणि रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पुढील स्लाइड्सवर वाचा, पठाणकोटमधील इतर हिरोजची कथा...
2. आईला म्हणाला, माझी वाट पाहू नको, यावेळी येऊ शकणार नाही..
नाव - गुरसेवक सिंग
पद - कमांडो, गरुड स्पेशल फोर्स
वय - 28 साल
स्पेशल गरुड फोर्सचे शहीद कमांडो गुरसेवक सिंग अंबालाच्या गरनालाचे राहणारे होते. सुमारे साडेपाच वर्षांपूर्वी ते इंडियन एअरफोर्समध्ये जॉइन झाले होते. शहीद गुरसेवक याचा विवाह 45 दिवसांपूर्वीच झाला होता. त्यांचे वडील आणि मोठा भाऊ हरदीपही लष्करात होते. त्यामुळेच गुरसेवकनेही देशाची सेवा करण्याचा निर्णय घेतला होता. वडील म्हणाले, माझा मुलगा खूप शूर होता. त्याला लहानपणापासूनच धाडसी कामांची आवड होती. तो जाताना आईला म्हणाला होता की, यावेळी माझी वाट पाहू नको मी येऊ शकणार नाही.

असे झाले शहीद
पठाणकोट एअरबेसवर दहशतवादी हल्ल्यानंतर शत्रूला मारण्यासाठी गरूड स्पेशल फोर्सच्या काही निवडक कमांडोंना पाठवण्यात आले होते. त्यावेळी एन्काऊंटरमध्ये गोळी लागल्याने ते शहीद झाले होते.

पुढे वाचा, शहीद फतेह सिंगच्या मुलीने अंत्ययात्रेत दिला खांदा...

3. शहीद कॅप्टनने जिंकले होते शुटिंगमध्ये गोल्ड मेडल
नाव - फतेह सिंग
पद - ऑनररी कॅप्टन, डीएससी (डिफेन्स सेक्युरिटी कॉर्प्स)
वय - 51 वर्षे
कॅप्टन फतेह सिंग यांनी दहशतवाद्यांच्या AK 47 चा सामना करताना दोघांना कंठस्नान घातले होते. मात्र नंतर तेही शहीद झाले. ऑनररी कॅप्टन फतेहसिंग पंजाबच्या झंडे गुज्जरांचे राहणारे होते. चार महिन्यांपूर्वीच बदली होऊन ते पठाणकोटला आले होते. शहीद कॅप्टनने 1995 कॉमनवेल्थ शुटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकले होते. त्यांची मुलगी मधूने त्यांच्या अंत्ययात्रेला खांदा दिला होता. त्यांचा मोठा मुलगा गुरदीपही आर्मीत आहे.

पुढील स्लाइड्वर वाचा.. 30 वर्षांनी मिळाली होती कुटुंबाबरोबर राहण्याची संधी

4. 30 वर्षांनी मिळाली होती कुटुंबाबरोबर राहण्याची संधी
नाव - कुलवंत सिंग
पद - हवालदार, डीएससी (डिफेन्स सेक्युरिटी कॉर्प्स)
वय - 49 वर्षे
ड्युटीवर तैनात असलेले हवालदार कुलवंत सिंग एअरबेस गेटवर दहशतवाद्यांशी लढताना शदीह झाले होते. लष्करातून निवृत्त झालेल्या कुलवंत सिंग यांनी 4 वर्षांपूर्वी डीएससी जॉइन केले होते. दोन महिन्यांपूर्वीच ते पठाणकोटमध्ये तैना झाले होते. ते पंजाबच्या गुरदासपूरचे राहणारे होते. पंजाबमध्ये पोस्टींग मिळाल्याने त्यांची पत्नी हरभजन कौर खूप आनंदी होती. त्याचे कारण म्हणजे 30 वर्षांनंतर त्यांच्या कुटुंबाला एकत्र राहण्याची संधी मिळाली होती. त्यांना दोन मुले आहेत. त्यापैकी मोठा मुलगा सुरिंदर 12 वींचा विद्यार्थी आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा, निःशस्त्र जवानांनी त्याच्याच बंदुकीने मारले दहशतवाद्याला...

5. निःशस्त्र जवानाने दहशतवाद्याला त्याच्यात बंदुकीने मारले...
नाव - जगदीश चंद
पद - हवालदार, डीएससी (डिफेन्स सेक्युरिटी कॉर्प्स)
वय - 58 वर्षे
डीएससी मेसच्या कूक हाऊसमध्ये नाश्त्याची तयारी सुरू होती. त्याचवेळी दहशतवाद्यांनी फायरिंग सुरू केले. या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले. त्यानंतर दहशतवादी पुढे गेले तर जगदीश सिंग त्यांच्या मागे पळाले. त्यांनी एका दहशतवाद्याला पकडे आणि त्याची रायफल हिसकावून त्यालाच मारले. त्यानंतर इसके ते इतर दहशतवाद्यांचा पाठलाग करण्यासाठी त्याच्याकडे पळाले. पण दहशतवाद्यांची गोळी लाली आणि ते शहीद झाले.

पुढे वाचा, हॉस्पिटलमध्ये भेटायला गेले होते कुटुंबीय पण त्यांना परत पाठवले...
6. हॉस्पिटलमध्ये भेटायला कुटुंबीयांना परत पाठवले
नाव - संजीव कुमार राणा
पद - हवालदार, डीएससी (डिफेन्स सेक्युरिटी कॉर्प्स)
वय - 51 वर्षे
डीएससीचे जवान संजीवकुमार पठाणकोट एअरबेसच्या आत दहशतवाद्यांचा सामना करताना शहीद झाले होते. या हल्ल्यात ते जखमी झाल्यानंतर त्यांचे कुटुंबीय हिमाचल प्रदेशच्या कांगडाहून पठानकोटला पोहोचले होते. पत्नी पिंकी देवी म्हणाल्या की, अनेकदा विनंती करूनही अधिकाऱ्यांनी त्यांना भेटू दिले नाही. त्यांनी सांगितले की, संजीव कुमार यांना आर्मी हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डात शिफ्ट करण्यात आले आहे. सोमवारी कांगडामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते 6 वर्षांपूर्वी आर्मीमधून निवृत होऊन डीएससीमध्ये ड्युटी करत होते. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, कर्तव्यासाठी झाले शहीद...

7. कर्तव्यासाठी झाले शहीद
नाम- मोहीत चंद
पद- हवालदार, डीएससी (डिफेन्स सेक्युरिटी कॉर्प्स)
या शहीदांमध्ये हवालदार मोहीत चंद यांच्या नावाचा समावेशही आहे. त्यांनीही कर्तव्यासाठी धैर्याने शत्रूबरोबर लढा देत वीरमरण पत्करले.
बातम्या आणखी आहेत...