आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 7 Year Old\'s Body Found Hanging From Tree In Bengal

प. बंगालमध्ये बालिकेचा मृतदेह झाडाला लटकलेला, गावकर्‍यांकडून आरोपीची हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता- पश्चिम बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील एका गावात 7 वर्षीय मुलीचा मृतदेह झाडावर लटकलेला आढळला. त्यानंतर गावकर्‍यांनी या प्रकरणी संशयीत आरोपी एक मांत्रिक आणि त्याच्या दोन साथीदारांना चांगलेच चोपले. उपचारादरम्यान मांत्रिकाचा मृत्यू झाला तर इतर दोघांची प्रकृती गंभीर आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गावकर्‍यांनी मांत्रिकाचे घर जाळले आहे. या प्रकारानंतर गावात तणावाचे वातावरण पसरले आहे. कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून गावात दंगल विरोधी पोलिसांना तैनात करण्यात आले आहे.

गावकर्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी बुधवारी संध्याकाळी घरातून बेपत्ता झाली होती. मुलीला झाडाला लटकवण्यापूर्वी शारीरिक यातना देण्यात आल्या आहेत. गावकर्‍यांनी मांत्रिक आणि त्याच्या दोन्ही साथीदारांना चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. मागील काही दिवसांमध्ये लैंगिक शोषणाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याशिवाय, बंगळुरूमध्ये एका 6 वर्षीय मुलीवर शाळेतील मार्गदर्शकाने बलात्कार केल्याची घटनाही ताजीच आहे.

साडे तीन वर्षांच्या मुलाला क्रूरपणे मारणारी शिक्षिका
कोलकातामध्येच घरी शिकवण्यासाठी आलेल्या शिक्षिकेने एका साडेतीन वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण केल्याची घटनाही नुकतीच समोर आली आहे. ही महिला ट्यूशन घेण्यासाठी बुधवारी घरी आली होती. त्यानंतर तिने घराची दारे लावून या निष्पाप मुलाला अमानवीय मारहाण केली. ही शिक्षिका मुलाच्या आई-वडिलांनाही ट्यूशनच्या वेळात घरी राहू देत नसे. या कुटुंबाने घरात सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला असल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला. सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालेल्या व्हिडिओत या शिक्षिकेने अत्यंत निर्दयीपणे मुलाला मारहाण केल्याचे स्पष्ट दिसते. मुलाच्या आई-वडिलांनी या शिक्षिकेविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे.

(फोटो - घटनेनंतर गावात तणाव वाढल्याने पुलिस फोर्स तैनात करण्यात आली आहे.)