आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 7 Years Old Girl Rape In School At Bangalore, News In Marathi

बंगळुरुमध्ये आणखी एका विद्येच्या मंदिरात सात वर्षीय चिमुरडीवर बलात्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरु- बंगळुरुमधील प्रतिष्ठीत व्हिब्गयोर हायस्‍कूलमध्ये सहा वर्षीय चिमुरडीवर गॅंगरेप झाल्याची घटना ताजी असताना अशाच प्रकारची घटना समोर आली आहे. दक्षिण बंगळुरु एका शाळेत सात वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शाळेतील कर्मचार्‍याच्या मुलाला अटक केली आहे. गेल्या 21 जुलै रोजी ही घटना घडली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. नंतर पोलिसांनी शाळेतील कर्मचार्‍याच्या मुलाला अटक केली आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी व्हायची आहे. त्यामुळे पोलिसांना वैद्यकीय अहवालाशिवाय पुढील कारवाई करता येत नसल्याचे सुत्रांनी सांगितले.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, सहा वर्षाच्या मुलीवर झाला होता गॅंगरेप!