आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

70 किलोची सोन्याची मूर्ती : सर्वांना अभिषेक शक्य; 1500 किलो सोन्याचे मंदिर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेल्लोर, तामिळनाडू - छोट्या-छोट्या डोंगरांमुळे वेल्लोरजवळील मलाइकोडी आकर्षित करते. हिरवाईतून वाट काढत आम्ही लक्ष्मी नारायणी सुवर्ण मंदिराच्या दिशेने चालू लागलो. तेव्हा आम्हाला आपण करत असलेल्या लक्ष्मीच्या वैभवशाली रूपाचे दर्शन झाले. ७० किलो सोन्याच्या लक्ष्मीची ही मूर्ती भक्तांसाठी तयार करण्यात आली आहे. आम्ही मूर्तीला स्पर्श करत होतो. तुळशीच्या पाण्याने अभिषेक करत हाेतो. मंदिर दीड हजार किलो सोन्यापासून तयार करण्यात आले आहे. मंदिरात वार्षिक दीपोत्सवाला सुरुवात झाली आहे. देशातील हजारो लोक येथे पोहोचू लागले आहेत. मंगळवारी धनत्रयोदशीच्या निमित्ताने ३० हजारांहून अधिक भाविक येथे दर्शनासाठी आले होते. त्यापैकी २० हजार भाविकांनी मातेला अभिषेक केला. दीपावलीच्या निमित्ताने अर्थात बुधवारी भाविकांची संख्या दुप्पट होती. मंदिर विश्वस्तांच्या मते, धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंत पाच दिवसांच्या दीपपर्वादरम्यान दीड लाखाहून अधिक लोक दर्शनासाठी येथे दाखल झाले आहेत.  मंदिराचा परिसर १०० एकर एवढा आहे. त्याचा आकार श्रीयंत्रासारखा आहे.   श्रीयंत्राच्या आकारात १००८ दिवे उजळले आहेत. त्याशिवाय सुवर्ण पुष्प अर्चन, कुंकुम अर्चन, श्रीसूक्त हवनासह दरदिवशी १५ प्रकारचे विशेष पूजन असे धार्मिक विधी केले जात आहेत. हजारो भाविक दीपदानदेखील करत आहेत. दक्षिण भारतातील मंदिरांत मूर्तींना स्पर्श करण्याची परवानगी नसते. परंतु या मंदिरात प्रत्येक भाविकाला अभिषेक, पूजा इत्यादी करताना मातेच्या मूर्तीला स्पर्श करता येऊ शकतो. भक्तांसाठी महालक्ष्मीची ही मूर्ती खास तशा प्रकारे तयार केली आहे.  मंदिराच्या मुख्य गर्भगृहात कमलासनाधिष्ठित माता महालक्ष्मीची पाच फुटांची मूर्ती आहे. मंदिराचे पुजारी म्हणाले, ऋग्वेदात श्रीसूक्तामध्ये महालक्ष्मीचे सुवर्णमयी, चंद्रासारखी शुभ्र कांती, सोन्या-चांदीचे हार, पीत वर्ण असे सुंदर वर्णन सांगितलेले आहे. अगदी तशाच प्रकारची ही मूर्ती आहे. दररोज सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यान मातेला अभिषेक करता येऊ शकतो. देवस्थानचे जनसंपर्क प्रमुख आर. भास्कर म्हणाले, जास्तीत जास्त भाविकांना मातेला अभिषेक करण्याची संधी मिळावी, त्यामुळे अभिषेकासाठी बारा तास एवढा मोठा कालावधी उपलब्ध करून दिला आहे.  
बातम्या आणखी आहेत...