आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

70 वर्षांचा मुलगा 95 वर्षीय आईला ऐकवतो अंगाईगीत, नात्यांची अनोखी कहाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिकानेर - ७० वर्षीय श्यामल ९५ वर्षांच्या आपल्या आईला मोठ्या प्रेमाने व्हील चेअरवर बसवून मोठ्या प्रेमाने तिचे केस नीटनेटके करतात. तिला न्हाऊ घालतात, हाता पायाची मालिश करतात आईला वेणीही घालतात. मुलगा होऊन त्यांच्यासह विविध प्रकारचे खेळही खेलू लागतात.
 
रात्री गोष्टीसह अंगाई गीतही (लोरी) ऐकवून झोपवतात. आईसाठी त्यांनी आपली बँक व्यवस्थापकाची नोकरीही सोडली आहे आणि वृद्धाश्रमात जीवन घालवित आहेत. श्यामल मूळचे पश्चिम बंगालचे. जीवन व्यतीत करत आहेत जयपूरच्या ओल्ड एज होममध्ये.  
 
श्यामल यांचे वडील हिंदुस्थान सॉल्टमध्ये मोठे अधिकारी होते. श्यामल राजस्थानात अनेक ठिकाणी बँकेत अधिकारी म्हणून राहिले. दीर्घकाळ त्यांनी आई-वडील, पत्नीसह घालविला आहे.  १९९४ मध्ये वडिलांचा सायलेंट अॅटॅकने अचानक मृत्यू झाला. जबाबदारी वाढली तेव्हा पत्नी अपत्य नसल्याने त्रस्त होण्याचा आरोप लावत लावतच त्यांना सोडून गेली. बस या जगात श्यामल यांच्यासाठी आईच राहिली. आई नीलिमासह मग त्यांनी समाधानाचे जीवन व्यतीत करण्याचे ठरविले. 

वर्ष २००० मध्ये बँकेची नाेकरी  सोडली. अनेक ठिकाणे शोधली पण शेवटी आईला २००८ मध्ये पसंत पडले वृद्धाश्रम. कारण की येथे आपल्यासारखेच त्रस्त लोक भेटतात तेव्हा आपलेपण वाटू लागले. आईने मुलाला वृद्धाश्रमापासून दूर राहण्यास सांगितले, पण श्यामल यांनी प्रथम दिवसापासून वृद्धाश्रमात आईबरोबर राहण्याचा नवा प्रारंभ केला. हळूहळू आपले सर्वकाही विकून टाकले. प्रत्येक क्षण आईबरोबर राहू लागले. म्हणतात की, आईशिवाय जगू शकणार नाही. ते आईजवळच झोपतात. गोष्टी आणि अंगाई गीत ऐकवून आईला लहान बाळासारखे झोपवतात.
 
सकाळी त्यांना जेव्हा जाग येते तेव्हा सर्वप्रथम ते आईचा चेहरा पाहतात. अनेक वर्षात क्वचितच असे झाले असेल की, जेव्हा श्यामलने हा चेहरा पाहिल्याशिवाय दिवस घालविला असेल. ते सांगतात की, मला चांगले आठवते कसे आईने बालपणी आपली काळजी घेतली कसे पालनपोषण केले. ते आईलाही त्याचप्रमाणे जाणीव देऊन सेवा करू इच्छितात ते परत करू इच्छितात. यात जराही चूक होऊ नये यासाठी दुसरे लग्न न करण्याचा निर्णय घेतला.   
 
बातम्या आणखी आहेत...