आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठांची काळजी घेताहेत रायपूरचे 700 तरुण, दररोज फोनवर विचारपूस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर- छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ दांपत्यांना आता सुरक्षा व देखभालीसाठी काळजी करण्याची गरज राहणार नाही. शहरातील काही तरुणांनी त्यांची देखभाल व ख्यालीखुशाली जाणून घेण्यासाठी रोज फोनवर संवाद सुरू केला आहे. आवश्यकता पडल्यास त्यांना रुग्णालयात नेले जाते शिवाय अन्य कामांतही मदत केली जाते.  

मुले नोकरी व व्यवसायानिमित्त परगावी राहत असल्यामुळे या ज्येष्ठ दांपत्यांना शहरात एकटे राहणे भाग पडत आहे. त्यामुळे त्यांची काळजी घेण्यासाठी राहुल शर्मा व त्यांच्या मित्रांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात राहुल म्हणाले, आसपास केवळ ज्येष्ठ दांपत्यच राहत होते. या सर्वांशी घरच्यांसारखे संबंध आहेत. अनेकदा त्यांना अडचणी आल्या. नातेवाइकांच्या सांगण्यावरून काही अंशी सोडवल्या होत्या. घरी जाऊन भेट घेतल्यामुळे त्यांचा एकटेपणाही दूर होत होता आणि सेवा करण्याचे समाधानही मिळते. मोठा झाल्यावर मित्रांशी यावर चर्चा करत होतो. त्यांच्याही ओळखीच्या आजी-आजोबांना अशा समस्या असत. यावर सर्वांच्या संमतीने ज्येष्ठांच्या मदतीसाठी संस्था स्थापन करण्याचे ठरवले. २० जणांनी सुरू केलेल्या “ब्राह्मण युवा पहल’चे आज ७०० सक्रिय सदस्य आहेत. यात ६० महिला- तरुणींचाही समावेश आहे. दीड वर्षापूर्वी स्थापन झालेली संस्था रक्तदान, रुग्णवाहिका व शववाहिकेसारखी सेवा देत आहे. याशिवाय बॉडी फ्रिजर, व्हिल चेअर, वॉकर, पेशंट बेड व काठीही उपलब्ध केली जाते. याच्या वापरानंतर वस्तू परत कराव्या लागतात. लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात राहतात. त्यासाठी १२ व्हॉट्सअॅप ग्रुप व फेसबुक पेजही बनवले आहे.  

राहुलचा एक सहकारी म्हणाला, देश-विदेशात  ज्येष्ठांच्या एकटेपणाच्या समस्येकडे गांभीर्याने पाहिले जाते. शहरात काही करता यावे यासाठी हा पुढाकार घेतला. सध्या आम्ही १० ज्येष्ठ दांपत्यांना नियमित मदत करतो. 

रोहिणीपुरममध्ये राहणारे घनश्याम व भारती मिश्रा म्हणाले, त्यांची मुले अमेरिकेत राहतात. राहुल व त्यांचे सहकारी कायम मदत करतात. कोणत्याही क्षणी फोन केल्यावर मदतीला धावून येतात. रुग्णालयात जायचे असेल किंवा औषध, सामान आणायचे असल्यास लगेच आणून देतात. यामुळे आम्हाला मुलांची कमतरता भासत नाही.
बातम्या आणखी आहेत...