आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेत नव्हते म्हणून 73 वर्षीय भागीरथी बिसईंनी चक्क छतावर घेतले पीक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमिनीवर नव्हे, घराच्या छतावर केलेली शेती - Divya Marathi
जमिनीवर नव्हे, घराच्या छतावर केलेली शेती
रायपूर- महासमुंदच्या नयापूर येथील 73 वर्षीय भागीरथी बिसई यांच्याकडे शेतजमीन नव्हती तर त्यांनी घराच्या छतालाच शेत बनवले. 2004 मध्ये एफसीआयमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी छतावर 100 चौरसफुटामध्ये धान पेरले. प्रयोग यशस्वी ठरला. त्यानंतर दोन मजली घर बांधले तीन हजार चौरस फुटाच्या छतावर सहा इंच मातीचे वाफे तयार केले.

छतावरील पिकाला दिलेले पाणी खाली गळण्याची तसेच स्लॅपच्या सळया गंजण्याचा तसेच वजन गंजामुळे छत पडण्याचा धोका होता. त्यामुळे लोखंडी सळयांसोबतच बांबू बांधले. कारण बांबू लवकर कुजत नाहीत.

बांबू वापरून छताचे मॉडिफिकेशन केले
तीन वर्षंपासून पीक घेताहेत : भागीरथीबिसई हे या शेतात दोन क्विंटल धानाचे उत्पादन घेत आहेत. भाज्या तसेच झाडे, रोपांची नर्सरीदेखील तयार करत आहेत. यात त्यांना पत्नी मुलांचे सहकार्य मिळत आहे. ते म्हणतात की आम्ही सगळे मिळून कुटुंबाची गरज भागेल इतके धान्य पिकवतो.

पुढील स्लाइडवर पाहा, भागीरथ बिसई व त्यांच्या शेताचे फोटोज...
(फोटो -प्रवीण देवांगन)