आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरखपूर रुग्णालयात 7 दिवसांत 75 मृत्यू; खासगी प्रॅक्टिसचा ठपका, डॉ. कफिल यांची हकालपट्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. कफिल यांच्या रुग्णालयात चौकशी सुरू होताच त्यांच्या नावाच्या पाटीवर पांढरा रंग लावण्यात आला. - Divya Marathi
डॉ. कफिल यांच्या रुग्णालयात चौकशी सुरू होताच त्यांच्या नावाच्या पाटीवर पांढरा रंग लावण्यात आला.
गोरखपूर - गोरखपूर परिसरात इन्सेफेलायटिसने ३९ वर्षांत १० हजारांहून अिधक मुलांचा मृत्यू झाला. मात्र, याची कारणे शोधण्यासाठी सरकारला आता जाग आली. केंद्राने रविवारी येथे संशोधन केंद्र उभारण्यास मंजुरी दिली. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्यासोबत रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आलेले केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी ही माहिती दिली. त्यांनी केंद्रासाठी ८५ कोटी दिले जातील, यावरच भर दिला, तर योगी राज्य सरकारचा यात दोष नसल्याचे सांगत राहिले.

दोषींना असे कठोर शासन करू की लक्षात राहील, असेही ते म्हणाले. दरम्यान, योगींचा दौरा संपताच इन्सेफेलायटिस विभागाचे प्रभारी डॉ. कफिल खान यांची हकालपट्टी करण्यात आली. ते अधीक्षक उपप्राचार्यही होते. सरकारी नोकरी असताना ते खासगी रुग्णालय चालवत. बहुतांश वेळ तेथेच घालवत. गोरखपूर रुग्णालयात ऑक्सिजन संपल्यावर डॉ. खान यांनी स्वत:च्या गाडीत खासगी रुग्णालयातून सिलिंडर आणल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

संशय... डॉ. कफिल आपल्या क्लिनिकमध्ये सरकारी ऑक्सिजन सिलिंडर वापरत होते
गाेरखपूरमध्ये लहान मुलांचा चांगला दवाखाना शोधायला जाल तेव्हा तुम्हाला कुणीही मेडी स्प्रिंगचे नाव सांगेल. त्याचे संचालक डॉ. कफिल खान आहेत. दोन दिवसांपूर्वी मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजन सिलिंडर पुरवण्याच्या कामात ज्यांचे कौतुक झाले तेच हे कफिल. रुस्तमपूरमधील स्वत:च्या याच रुग्णालयातून ते रात्री सिलिंडर घेऊन गेले हेाते. बाहेर डॉ. के. खान यांच्या नावाची पाटी होती. वृत्तपत्रांतील बातम्यांचा फ्लेक्सही लावला होता.
 
नोकरीत असताना डॉ. कफिल स्वत:चे रुग्णालय कसे चालवत होते, असे विचारल्यावर कर्मचाऱ्यांचा सूरच बदलला. डॉ. कफिलयेथूनसिलिंडर का घेऊन गेले? हे सिलिंडर मेडिकल कॉलेजची होती का? या प्रश्नांवर ते गप्प बसले. म्हणाले, हे रुग्णालय कफिल यांच्या पत्नी शबिस्ता आझम खान चालवतात. त्यांचे केवळ नाव दिले आहे. मात्र, मुलगा नेहा मधूला दाखवण्यासाठी आलेल्या नातेवाइकाने वस्तुस्थिती सांगितली. शबिस्ता तर डेंटिस्ट आणि आझम बीयूएमएस डॉक्टर असल्याचे ते म्हणाले. काही वेळानंतर कफिल यंाचे रुग्णालयाबाहेरचे नाव पुसण्यात आले. कफिल यांची भेट होऊ शकली नाही.
 
सीएम योगी म्हणाले, आपत्ती तुमच्यामुळे, आता हीरो बनताय...?
- मुख्यमंत्री आदित्यनाथांनी बंद खोलीत मेडिकल कॉलेजच्या कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली.
- डॉ. कफिलना म्हणाले, दिवसभरात २१ सिलिंडर लागतात, तुम्ही तीनच आणले आणि हीरोगिरी करताय?
- योगी म्हणाले : दुसरे डॉक्टर उपचारात व्यस्त असताना तुम्ही फोटो काढण्यात गुंगला होतात.
- स्वत:च संकट निर्माण केले, वर फोटो काढून हीरो बनताय?
- मार्च २०१५मध्ये डॉ. कफिल त्यांच्या बंधूवर बलात्काराचा गुन्हाही नोंद झालेला आहे.
 
 
 
बातम्या आणखी आहेत...