आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृतसर: निधनानंतर देहदानाचे विसरून जाऊ नये म्हणून तसे गोंदवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर - ७६ वर्षीय कॉस्ट अकाउंटंट जसवंतलाल चावला यास तर्कशीन शीख प्रचारक स्वर्गीय संतसिंग मस्कीन यांच्या प्रेरणादायक शब्दांनी याप्रकारे प्रभावित केले की त्यांनी मरणोत्तर अापले शरीर दान करण्याचा संकल्प केला. यासाठी न केवळ त्यांनी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्या असे नव्हे तर एवढे करूनही पार्थिवावर अंतिम संस्कार होऊ नयेत, यासाठी त्यांनी या आशयाचा संदेश  डाव्या बाजू म्हणजे हातावर कायमसाठी गोंदवूनच घेतले की निधनानंतर मृतदेह मेडिकल रिसर्चसाठी डॉक्टरांच्या ताब्यात दिला जावा.  

जसवंत चावला सांगतात की, गेल्या वर्षी अमेरिकेत जाण्यापूर्वी त्यांनी मित्रांना विचारले की, तुम्ही देहदानाचे घोषणापत्र लिहिले आहे काय? पण कधी तुम्ही विचार केला आहे का, की जेव्हा तुम्ही शेवटचा श्वास घ्याल तेव्हा कशी वेळ असेल, कोणती जागा असेल? असेही होऊ शकते की, तुमचे प्राण एका अनोळखी जागेत वा लोकांमध्ये जाऊ शकतात. यासाठी काही असे करा की, आपण केलेल्या प्रणानुसार आपल्या मृत शरीराचा वापर व्हावा. यासाठी त्यांनी टॅटू बनवण्याचा निश्चय केला आहे.  

त्यांनी सांगितले की, अमेरिकेत ते अचानक फरशीवर पडले होते. रुग्णालयात जेव्हा एका डॉक्टरने त्यांच्या हातावरील स्वत: गोंदवलेला संदेश वाचला तेव्हा त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना बोलावून तो संदेश दाखवला आणि न केवळ त्यांची प्रशंसा केली तर त्यांच्यावर उपचारही  मोफत केले. 

 

बातम्या आणखी आहेत...