आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरमहा आठ बीएसएफ जवानांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, दोन वर्षांत २०३ मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - सीमा सुरक्षा दल(बीएसएफ) गंभीर समस्येने ग्रासले आहे. गेल्या दोन वर्षांत बीएसएफच्या २०३ जवानांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या दलात प्रत्येक महिन्यात सरासरी अाठ जवानांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने होत आहे. एका अहवालात जीवनशैली व खाण्यापिण्याची सवय हे त्यामागचे कारण सांगितले. जवानांनी पीटी तसेच गेम्समध्ये भाग न घेणेही एक कारण मानले जाते. अहवालानंतर जवानांना रात्री नॉनव्हेज न खाण्याचा सल्ला दिला.
मेसमध्ये जुन्या तेलाच्या वापरास बंदी
हृदयविकाराच्या आजारापासून वाचवण्यासाठी बीएसएफने कडक निर्देश दिले. त्यात मेसमध्ये जुने तेल न वापरणे, जवानांनी सकाळी ४५ मिनिटे गेम्स खेळण्यास सांगितले आहे. दररोज १० ग्रॅम जवसाचे सेवन करण्याचे निर्देश दिले आहेत.
जवानांना नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण
बीएसएफ जवानांना नऊ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये फील्ड ड्यूटीसाठी वर्षापेक्षाही जास्त अवधी लागतो. यादरम्यान जवानाला शत्रूवर लक्ष ठेवणे, मॅप रीडिंग, शस्त्र चालवणे व नक्षलग्रस्त भागात ड्यूटी करावी लागते. यात वर्षापेक्षा जास्त अवधी लागू शकतो.
डिनरमध्ये नॉनव्हेज खाऊन झोपल्यास जवानांना हृदयविकाराचा आजार वाढतो. त्यामुळे बीएसएफने आता केवळ लंचमध्येच नॉनव्हेज देण्याचे निर्देश दिले आहेत.-डाॅ. बी.आर.मेघवाल,आयजी बीएसएफ, राजस्थान