आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य राणी एक्स्प्रेस’चे ८ डबे रुळावरून घसरले; उत्तर प्रदेशातील रामपूरजवळील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मीरतहून लखनऊला जाणाऱ्या राज्य राणी एक्स्प्रेसचे ८ डबे उत्तर प्रदेशातील रामपूरजवळ रुळावरून घसरले. या अपघातात २ प्रवासी जखमी झाले आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली असून या अपघाताच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत.

घातपाताचा संशय : या रेल्वे अपघातात रेल्वेने घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. ‘बाह्य घटकां’मुळे रेल्वे रुळामध्ये बिघाड झाला असावा. २७ फेब्रुवारी रोजी रुळाची अल्ट्रॉसॉनिक फ्लॉ डिटेक्टरद्वारे चाचणी केली होती, तेव्हा दोष आढळला नव्हता, असे रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...