आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'राम\' पासून स्वामीपर्यंत, आठ दिग्गज करत आहेत आसाराम यांच्या सुटकेसाठी प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - तुरुंगात कैद असलेले स्वंयघोषित संत आसाराम यांची वकिली आता डॉ. सुब्रमण्यम स्वामी करणार आहेत. गुरुवारी त्यांनी आसाराम यांची तुरुंगात भेट घेतली. 18 महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या आसाराम यांना, पुढील भेट बाहेर होईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे. स्वामी माध्यमांना म्हणाले, 'लालू यादव आणि जयललिता यांना जामीन मिळू शकतो मग आसाराम यांना का नाही?' त्यांची बाजू मांडण्याची सुरुवात जोधपूरमधून करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय इतर प्रकरणांशी माझे काही देणे-घेणे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आसाराम यांना जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न करणारे स्वामी हे आठवे वकील आहेत. आतापर्यंत रामजेठ मलानी, सलमान खुर्शीद, केटीएस तुलसी यांच्यासह देशातील अनेक दिग्गज वकिलांनी आसाराम यांचे वकिलपत्र घेतले होते. पीडितेच्या वतीने सरकारी वकील प्रमोद कुमार आणि पी.सी.सोलंकी काम पाहात आहेत.
कोण आहेत डॉ. सुब्रमण्यम स्वामी
डॉ. सुब्रमण्यम स्वामी हे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते आहे. स्पेक्ट्रम घोटाळा उघड करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.
मीडियाला पाहून 'तेरे बाप'वरुन 'परमपिता'वर आले आसाराम
कोर्टात माध्यमकर्मींनी विचारले, तुम्हाला कोणावर विश्वास आहे? यावर संतप्त झालेले आसाराम म्हणाले, 'तुझ्या बापावर!' मात्र नंतर कॅमेरे पाहिल्यानंतर ते ताळ्यावर आले आणि म्हणाले, 'तो, जो तुझा - माझा आणि आपल्या सगळ्यांचा परमपिता आहे.'
का आहे तुरुंगात?
आसाराम यांच्यावर त्यांच्याच आश्रमातील अल्पवयीन विद्यार्थीनीच्या लैंगिक शोषणाचा आरोप आहे. या प्रकरणात आसाराम यांच्यासह त्यांचा स्वंयपाकी आणि आश्रमाची केअर टेकरचाही समावेश आहे. तिनेच अल्पवयीन विद्यार्थीनीला आसारामपर्यंत पोहोचवल्याचा आरोप आहे.
याशिवाय गुजरातमधील दोन बहिणींनीही आसाराम आणि त्यांचा मुलगा नारायण साईवर बलात्काराचा आरोप केला आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, ते वकील ज्यांनी आसाराम यांना सोडवण्याचा प्रयत्न केला.