आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव खासगी बसने स्कूल व्हॅनला उडवले, 8 विद्यार्थी ठार, 12 गंभीर जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बस अतिशय वेगात होती. या दर्घटनेत 8 विद्यार्थी ठार झाले. - Divya Marathi
बस अतिशय वेगात होती. या दर्घटनेत 8 विद्यार्थी ठार झाले.
मेंगलोर - कर्नाटकमध्ये एक शाळकरी मुलांच्या व्हॅनाला मागून येणाऱ्या खासगी बसने धडक दिली. या दुर्घटनेत 8 मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 12 मुले गंभीर जखमी आहेत. अपघात मंगळवारी सकाळी 10 वाजता, मेंगलोरपासून 100 किलोमीटर अंतरावरील कुंडपूर येथे झाला. बस अतिशय वेगात होती, ती व्हॅनला धडकल्याचे काहींनी सांगितले आहे. धडक एवढी जोरदार होती की व्हॅनच्या मागच्या भागाचा चुराडा झाला.

डॉन बॉस्को शाळेची होती व्हॅन
- मंगळवारी सकाळी अपघात झालेली व्हॅन डॉन बॉस्को शाळेची होती.
- मीडिया रिपोर्टनुसार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
- जखमी मुलांची स्थिती गंभीर असल्याचे कळते.
- जेव्हा दुर्घटना झाली तेव्हा पाऊस सुरु होता.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...