आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 8 Suspects Take Remmand In The Of Case Gangrape On Nan

नन सामुहिक बलात्कार प्रकरणी ८ संशयित ताब्यात, चार संशयितांची छायाचित्रे जारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कृषनगर / कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये कॉन्व्हेंट स्कूलमधील ननवरील सामूहिक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी आठ संशयितांना ताब्यात घेतले आहे. शाळेतून मिळालेल्या फुटेजवरून चार संशयितांची छायाचित्रे जारी केली आहेत. आरोपींची माहिती देणा-यास
पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

नदिया जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अर्णब घोष म्हणाले, आठ संशयितांना ताब्यात घेतले आहे. पीडित ननला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणाची सीआयडी चौकशी सुरू आहे. शुक्रवारी रात्री दरोडेखोरांनी नदिया जिल्ह्याच्या रानाघाटमध्ये ७१ वर्षीय ननवर अत्याचार केला आणि शाळेच्या कपाटातून १२ लाख रुपये
चोरले होते.

ननला याआधी धमकी मिळाली : अत्याचारग्रस्त ननला याआधी धमकी मिळाली होती. त्यांनी पोलिसांकडे सुरक्षेची मागणीही केली होती. मात्र, पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यानंतर ननवरील अत्याचाराचे प्रकरण समोर आल्याचा आरोप बंगीय क्रिस्टिया परिसेवेचे प्रदेशाध्यक्ष हेरॉल्ड मलिक यांनी केला.

पुढे वाचा... गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी