आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इयत्ता पाचवीपर्यंतच्या 80 मुलांनी उघडली बँक, 63 हजार रु. जमवले; बिनव्याजी रक्कम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिलासपूर- छत्तीसगडमधील हरदीपारा प्राथमिक शाळेत मुलांना शिक्षणासोबतच पैशांची बचत करण्याचेही धडे दिले जात आहेत. त्याचा फायदाही दिसत आहे. शाळेत एकूण ९२ मुले शिकतात. त्यापैकी ८० मुलांनी पैसे जमा केले आणि शाळेतच एक मनी बँक उघडली. पैसे जमा करणाऱ्या प्रत्येक मुलाजवळ पासबुकही आहे. सध्या मुलांची एकूण बचत ६३ हजार रुपये झाली आहे. 

शाळा प्रत्येक मुलाच्या बचतीचा हिशेब ठेवते आणि गरज पडल्यावर त्यांच्या कुटुंबीयांना बिनव्याजी पैसेही उधार देते. प्राथमिक शाळेतील मुले घरून जे पैसे मिळतात ते खर्च करत नाहीत. शाळेत जमा करतात. प्राचार्य योगेंद्र गौरहा यांनी सांगितले की, मुलांना स्वच्छता, आरोग्य आणि बचतीचे धडेही दिले जातात. आज बचत केली तर उद्या ती कामी येईल, असे मुलांना समजावून सांगितले जाते. आम्ही मुलांच्या आई-वडिलांशीही बोललो. त्यामुळे मुले बचत करतात. हळूहळू बचत करणाऱ्यांची संख्या ८० झाली. मुले आता वही किंवा पेन घेण्यासाठी पालकांकडून पैसे घेत नाहीत. ते पासबुकमध्ये एंट्री करून शाळेच्या मनी बँकेतूनच पैसे काढतात.  
 
 
शाळेत किचन गार्डन, स्मार्ट क्लासही  
युनिसेफशी संबंधित लक्ष्मी जायसवाल म्हणाले की, किचन गार्डन आणि जैविक खत अशा सुविधा असलेली छत्तीसगडमधील ही पहिली शाळा आहे. ग्रेड-एच्या विद्यार्थ्यांचे फोटो फेसबुकवर शेअर करतो. मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट क्लास असतात. शाळेला मॉडेल स्कूल पुरस्कार आणि रोल मॉडेल स्कूल पुरस्कारही मिळाला आहे.  
 
 
केस-१ । पाचवीच्या माधुरी, आरती, अंकिताने वाचवले हजार रुपये  
पाचवीतील माधुरी, आरती आणि तिसरीच्या अंकिताने हजार रुपयांपर्यंत बचत केली आहे. चौथीतील युवराज सिंह आणि अस्मितकुमार यांचीही रक्कम एक हजारपर्यंत पोहोचणार आहे.  

केस - २ । वडिलांना खतासाठी, भावाला प्रवेशासाठी दिली रक्कम  
दूजराम सोरठेंची मुलगी शाळेत शिकते. त्यांना खताची गरज भासली तेव्हा पैसे नव्हते. शाळेतून दोन हजार घेऊन खत घेतले. राजनंदिनी गेल्या वर्षी पाचवीत होती. तिचा भाऊ राहुलला ११ वीच्या प्रवेशासाठी रक्कम कमी पडली तेव्हा शाळेने हजार रुपये उसने दिले.  
बातम्या आणखी आहेत...