आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाल्मिकी कुटुंबियांचा आरोप- धर्म परिवर्तनासाठी आजम खान टाकताहेत दबाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: रामपुरमध्ये उभारण्यात येत असलेला गांधी मॉल - Divya Marathi
फोटो: रामपुरमध्ये उभारण्यात येत असलेला गांधी मॉल
रामपूर - उत्तर प्रदेशमधील रामपूर जिल्ह्यातील तोफखाना रोडवर उभारल्या जात असलेल्या गांधी मॉलजवळ वास्तव्यास असलेल्या वाल्मिकी समुदायाच्या 80 कुटुंबियांवर मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. या सर्व कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी नगरपालिकेतील सिब्ते नबी नावाच्या अधिकाऱ्याने वाल्मिकी वस्तीवरील 55 घरांवर अतिक्रमणाची नोटीस लावली. या अधिकाऱ्याने सांगितले की, नोटीस लावलेली सर्व घरे अतिक्रमणामध्ये येतात आणि रस्ता रुंदीकरणासाठी ही घरे पाडावी लागतील. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार सिब्ते नबीने त्यांना सांगितले की, जर तुम्ही मुस्लिम धर्म स्वीकार केला तर तुमचे घर वाचू शकते. येथील रहिवाशांनी सांगितले की, सिब्ते नबीची उत्तर प्रदेशचे नगरविकास मंत्री आजम खानशी जवळीक आहे. या रहिवाशांचे असेही म्हणणे आहे की, यांची घरे पाडण्याची कारवाई आणि धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकण्यामागे आजम खान आहेत. गांधी मॉल आजम खान यांचा ड्रीम प्रोजेक्ट सांगण्यात येतो. या मॉलजवळ मोहम्मदअली जोहर विद्यापीठ आहे. आजम खान या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत.
दबावाखाली होऊ नये धर्म परिवर्तन -
घरे वाचवण्यासाठी वाल्मिकी परिसरातील लोक उपोषणाला बसले आहेत. घरे वाचवण्यासाठी हे लोक 14 एप्रिलला मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठीसुद्धा तयार आहेत. सोमवारी सकाळी वाल्मिकी वस्तीवर पोहोचलेल्या एक मौलवी मौलाना फुरकान रझा यांनी सांगितले की, वाल्मिकी वस्तीवरील लोक घर वाचवण्यासाठी मुस्लिम धर्म स्वीकार करण्यास तयार झालेत. मौलवीने शहर काझीसोबत या प्रकरणाची चर्चा केली. शहर काझींच्या मतानुसार कधीही दबावाखाली किंवा प्रलोभन देऊन धर्म बदलला जाऊ नये.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा संबंधित PHOTOS: