आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

62 वर्षांपूर्वीचे स्वप्न पूर्ण, रोज 14 तास अभ्यास; 83व्या वर्षी पित्याने केली पीएचडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - जोधपूरमध्ये राहणारे चल्ला सोमसुदरम  यांनी ८३ वर्षी अमेरिकेतील एका संस्कृत विद्यापीठात पीएचडी केली आहे. नववर्षाच्या प्रारंभी हैदराबादेत पीएचडी प्रदान केली तेव्हा ते चर्चेत आले. संशोधनासाठी त्यांनी रोज १४-१५ तास अभ्यास केला. 
 
सोमसुंदरम सांगतात, मी १९९१ मध्ये रेल्वेतून निवृत्त झालो. यानंतर १२ वर्षांनी एमए करण्याचे ठरवले. कुटुंबीयांना मी हे सांगितले तर सर्वांना आश्चर्य वाटले. नंतर ७९ व्या वर्षी मला पीएचडी करायची आहे म्हणून सांगितले तर घरच्यांना धक्काच बसला. माझा संशोधक मुलगा प्रो. सीव्हीआर मूर्तीकडूनच मला प्रेरणा मिळाली. मला टाइप करता येत नाही म्हणून मी संशोधन कार्य लिहून ठेवत होतो. मुलगा तो टाइप करत असे.. शनिवारी तर तो रात्रभर जागून टाइप करत असे. हा प्रबंध त्यानेच संपादित केला आहे. प्रो. मूर्ती आयआयटी जोधपूरमध्ये संचालक आहेत. सोमसुंदरम यांनी सांगितले, की त्यांचे वडील ज्योतिष्याचे अभ्यासक होते. 

१९५५ मध्ये मलाही यात आवड निर्माण झाली. मोकळ्या वेळेत मी वडिलांकडून हे शास्त्र शिकत असे. पुढे अभियांत्रिकीला प्रवेश घेतला. २००२ मध्ये पीएस विद्यापीठाचे प्रो. व्ही.बी सुब्रह्मण्यम यांनी ज्योतिषशास्त्रात एमए करण्यास सांगितले. २००३ मध्ये प्रवेश  घेऊन तीन वर्षांत अभ्यासक्रम पूर्ण केला. २०१२ मध्ये मी ७९ वर्षांचा झालो. पीएचडीसाठी मी अमेरिकेतील योग संस्कृत विद्यापीठात अर्ज केला. डॉ. एम. व्ही. आर्यराज माझे गाईड होते. एखादा माणूस या वयातही शिक्षण घेऊ शकतो हे पाहून आर्यराज गाइडशिप स्वीकारली.

संशोधनात इंटरनेटची गरज होती म्हणून संगणक शिकून घेतला
संशोधनात वारंवार इंटरनेटची गरज पडत होती म्हणून सोमसुंदरम यांनी संगणक शिकून घेतला. या विषयातील तज्ज्ञांची नावे व पत्ता ते इंटरनेटवरून शोधत असत, नंतर त्यांना भेटावयास जात. एकदा ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक बी. व्ही. रमन यांचा पत्ता त्यांनी खूप शोधला. मात्र, त्यांचे निधन झाले असल्याचे कळाले. त्यांनी रमन यांच्या मुलीचा दिल्लीतील पत्ता शोधून काढत माहिती मिळवली.
 
बातम्या आणखी आहेत...