आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 84 kosi Yatra: Forces Conduct Flag March In Ayodhya, Arrest Warrants Issued Against 70 VHP Leaders

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रामलल्लाच्या अयोध्येला लष्करी छावणीचे स्वरूप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अयोध्या /लखनऊ- अयोध्येत 84 कोसी परिक्रमेवरून वाद निर्माण झाला असून तो टोकाला गेला आहे. उत्तर प्रदेश सरकारने विश्व हिंदू परिषदेच्या 70 नेत्यांवर अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. सोबतच नेत्यांना अटक करणे सोपे जावे यासाठी शेजारी राज्यांना गोपनीय माहितीची देवाण-घेवाण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विश्व हिंदू परिषदेने देखील कोसी परिक्रमेच्या कार्यक्रमात काहीही बदल करणार नसल्याची ठाम भूमिका घेतली आहे. अयोध्येहून 25 ऑगस्टला ही यात्रा सुरू होईल. सरकारने ज्या विहिंप नेत्यांविरुद्ध वॉरंट जारी केले आहे. त्यात अशोक सिंघल, प्रवीण तोगडिया, रामविलास वेदांती यांचा समावेश आहे. फैजाबादमध्ये विहिंपच्या 20 कार्यकर्त्यांना अटक झाली आहे.

याबरोबरच पोलिसांनी छापेमारीचे सत्रही सुरू केले आहे. फैजाबाद प्रशासनाने परिक्रमा यात्रेत 40 ते 50 हजार लोक येण्याचा अंदाज लावला आहे. उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक आर.के. विश्वकर्मा शुक्रवारी म्हणाले, विहिंपच्या परिक्रमा यात्रेच्या पार्श्वभूमीवर शेजारी राज्यांकडून गुप्त माहिती मागवण्यात आली आहे. त्याचबरोबर विहिंप व भाजपशी संबंधित लोकांच्या फोनवर निगराणी करण्यात येत आहे. अयोध्या व फैजाबाद मार्गावर 42 ठिकाणी बॅरिकेडिंग करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. त्याचाच भाग म्हणून एडीजी अरुण कुमार यांना अयोध्येत शिबिर घेण्यास सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर सुरक्षेसाठी दोन एसपी, 16 एएसपी, 32 डेप्युटी एसपी, 80 पोलिस निरीक्षक, 247 उपनिरीक्षक, 600 शिपाई तैनात करण्यात आले आहेत. त्याशिवाय 13 कंपनी पीएसी, शरयू नदीच्या निगराणीसाठी एक कंपनी जल पीएसी तैनात करण्यात आली आहे. दरम्यान, विहिंपच्या परिक्रमेमध्ये राम जन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास मात्र सहभागी होणार नाहीत. ते मथुरेला जाणार आहेत. महंत म्हणाले, मी अगोदरच परिक्रमेमध्ये सहभागी होणार नसल्याचे विहिंपला कळवले होते.

अशी परंपरा नाही : अयोध्येचे आमदार पवन पांडेय म्हणाले, भाजपला फायदा व्हावा, यासाठी विहिंपने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी 84 कोसी परिक्रमेचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु अयोध्येत अशी कोणतीही परंपरा नाही. संतांचाही परिक्रमेला विरोध असल्याचा दावा पांडेय यांनी केला.

पुत्र प्राप्तीची इच्छा व मोक्षासाठी परिक्रमा
अयोध्येची 84 कोसी परिक्रमा सामान्य माणूस पुत्र प्राप्तीच्या इच्छेतून व साधू-संत मोक्षप्राप्तीसाठी करतात. महंत गयादास यांनी ही माहिती दिली. त्यांचे वय 57 वर्षे आहे. ते म्हणाले 10 वर्षांचा होतो, तेव्हापासून 84 कोसी परिक्रमा करत आलो आहे. भोजन तयार करणे, उपस्थित लोकांमध्ये त्याचे दान करणे व स्वत: खाऊन सर्वांचा निरोप घेणे, अशी परिक्रमासाठी असलेली अट आहे.