आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या मिसाईल मॅनच्या अद्भुत गोष्टी! लहानपणी वृत्तपत्रेही वाटली...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलाम... भारतवासीयांच्या हृदयात होते, आता आठवणींत सामावले म्हणजे अमर झाले आहेत. डॉ. अब्दुल कलाम यांची आज 86 वी जयंती. ते आपल्यात नाहीत. याचे शल्य सर्व भारतीयांना आहे. यानिमित्त DivyaMarathi.com त्यांच्या काही आठवणी शेअर करत आहे.
 
नेहमी म्हणायचे- मी शिक्षक म्हणून राहणेच पसंत करेन. जाईन तेही शिक्षकाच्या रूपात. झालेही तसेच.
सोमवार, 27 जुलै 2015 रोजी सायंकाळी ६.३० वाजता आयआयएम शिलाँगमध्ये लेक्चर देत होते. तेव्हाच हृदय बंद पडले. बेशुद्ध होऊन पडले. तत्काळ रुग्णालयात हलवले, पण ७.४५ वाजता त्यांना मृत घोषित केले. देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता. ते म्हणायचे- मी शिक्षक आहे आणि त्याच रूपात ओळख राहावी, अशी इच्छा आहे..
 
कलाम-राजू स्टेंट आणि हृदयविकार
हृदयाचा रक्तपुरवठा सुरळीत होण्यासाठी धमनीत टाकली जाणारी स्टेंट आयात करावी लागत होती. महागडी स्टेंट गरिबांना परवडत नव्हती. डॉ. कलामांच्या प्रेरणेने हृदयरोग तज्ज्ञ डॉ. बी. सोमा राजू यांनी पहिली भारतीय स्टेंट बनवली. तिचे नाव कलाम-राजू स्टेंट असे ठेवले गेले. कलाम यांचा मृत्यू हृदयविकारानेच व्हावा, याला काय म्हणावे? कलाम यांच्या प्रेरणेनेच डॉ. राजू यांनी उपचारात साह्यभूत टॅब्लेट पीसी तयार केला. त्याचे नावही कलाम-राजू टॅबलेट ठेवले गेले.
 
लहानपणी वाटली वर्तमानपत्रे
डॉ. अब्दुल कलाम यांची आज 86 वी जयंती. ते आपल्यात नाहीत. याचे शल्य सर्व भारतीयांना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलाम यांच्या जन्मगावी रामेश्‍वरम येथे स्मारक उभारण्‍याची घोषणा केली होती. तथापि, भारताचे माजी राष्‍ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम लहानपणी वर्तमानपत्र वाटण्‍याचे काम करत होते. आपल्या वडिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी ते शाळा सुटल्यानंतर वर्तमानपत्र वाटायला जात असत. सर्वांना आवडणा-या अशा डॉ. कलाम यांचे 27 जुलै 2015 रोजी निधन झाले.
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, डॉ. कलाम यांच्याशी निगडित अद्भूत गोष्‍टी...
बातम्या आणखी आहेत...