आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 88 Th Marathi Sahity Samelan Opening Ceremony At 4 Pm

साहित्य संमेलन : सारस्वत मेळ्यासाठी सजले घुमान; आज उद‌्घाटन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घुमान (पंजाब) - भाषा भगिनींचा संगम असलेल्या पंजाबातील घुमानमध्ये शुक्रवारपासून ८८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ होत आहे. दुपारी ४ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या उपस्थितीत संमेलनाचे उद‌्घाटन होईल.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पंजाबी लेखक गुरुदयालसिंह, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती राहील. नियोजित संमेलनाध्यक्ष सदानंद मोरे, विद्यमान संमेलनाध्यक्ष फ. मुं. शिंदे यांचे गुरुवारीच आगमन झाले. महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य यांच्या हस्ते ध्वजारोहण, नंतर नांदेडच्या नानक साई फाउंडेशनची भक्त नामदेव ग्रंथदिंडी निघणार आहे.
संमेलननगरीत रिमझिम पाऊस, पण मंडप वॉटरप्रूफ
संमेलननगरीत गुरुवारी सायंकाळी रिमझिम पाऊस झाला, परंतु संपूर्ण मंडप वॉटरप्रूफ असल्याने काहीही अडचण येणार नसल्याची ग्वाही संयोजकांनी दिली आहे. १० हजारांहून अधिक रसिक हजेरी लावतील, असा विश्वास त्यांना आहे.