आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजेशच्या शरीरावर होते 89 घाव; अतिरेक्यांची मानही लाजेने झुकेल, जेटलींची टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिरुवनंतपुरम: केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी हिंसाचारात ठार झालेले संघ कार्यकर्ता राजेश यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. - Divya Marathi
तिरुवनंतपुरम: केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी हिंसाचारात ठार झालेले संघ कार्यकर्ता राजेश यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
तिरुवनंतपुरम- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली रविवारी केरळच्या दौऱ्यावर होते. राजकीय हिंसाचारात आठवड्यापूर्वी मारले गेलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते राजेश यांच्या कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली. जेटली यांनी राज्यातील सत्तारूढ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षावर राजकीय हिंसाचार घडवून आणत असल्याचा आरोप केला. जेटली म्हणाले, ‘माकप आपल्या कार्यकर्त्यांमार्फत विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे, पण माकप हिंसाचार घडवून संघ आणि भाजपला झुकवू शकणार नाही. राज्यात जेव्हा जेव्हा माकपच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तारूढ झाले तेव्हा तेव्हा राजकीय हिंसाचाराच्या घटनांत वाढ झाली.’  

जेटली यांनी राजेश यांची पत्नी, दोन मुले आणि कुटुंबातील इतर लोकांची भेट घेतली. त्यानंतर जेटली म्हणाले की, ‘राजेश कमकुवत घटकातील व्यक्ती होती. तिच्या कुटुंबात आता कमावून आणणारे कोणीही नाही. फक्त संघाचा कार्यकर्ता असल्यामुळेच त्याची हत्या करण्यात आली. त्याच्या शरीरावर ८९  घाव घालण्यात आले. हे पाहिले तर दहशतवाद्यांचीही मान शरमेने झुकेल. देशाचा शत्रूही कोणाशी असा प्रकार करत नाही.’  

मुख्यमंत्री पिनरायी विजयन हे हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरले आहेत, असा आरोप जेटली यांनी केला. देशाच्या इतर भागांत अशा घटनांवर गोंधळ घालणारे लोक केरळमधील या हिंसाचारावर चुप्पी का साधून आहेत, असा प्रश्न जेटली यांनी उपस्थित केला.  
 
माकपची निदर्शने  
माकपने रविवारी राजभवनासमोर निदर्शने केली.  राजकीय हिंसाचारात ठार झालेल्या माकप कार्यकर्त्यांच्या घरीही जेटली यांनी भेट द्यावी, अशी त्यांची मागणी होती. १९८० पासून ठार झालेल्या माकपच्या २१ कार्यकर्त्यांचे नातेवाईकही निदर्शनांत सहभागी होते. माकपचे सचिव कोडियेरी बालकृष्णन म्हणाले की, जूनमध्ये अमित शहा यांच्या दौऱ्यानंतरच राजकीय हिंसाचार वाढला आहे.
बातम्या आणखी आहेत...