आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 8th Class Passed, 21 Years Sarpanch Awaites Village

रंजक कथा: ८ वी पास, २१ वर्षीय सरपंचाची गावाला प्रतीक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सरपंच व्हायचे म्हणून सांवरलालने घरात  शौचालय बांधकाम सुरू केले आहे. - Divya Marathi
सरपंच व्हायचे म्हणून सांवरलालने घरात शौचालय बांधकाम सुरू केले आहे.
जयपूर - अजमेर जिल्ह्यातील दादिया गावाला आता चक्क आठवी पास सरपंच मिळणार आहे. येथील सांवरलाल हा तरुण लवकरच वयाची २१ वर्षे पूर्ण करणार असून त्यानंतर १२ जुलै रोजी होणा-या पोटनिवडणुकीत तो सरपंच बनणे जवळपास पक्के आहे.

दादिया गावातील सरपंचपद अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव आहे. या कॅटेगरीतील चार तरुण आठवी पास होते, परंतु त्यांच्यापैकी तिघांचे वय २१ वर्षांपेक्षा कमी होते, तर चाैथ्या तरुणाला पाच मुले होते. त्यामुळे त्याला निवडणूक लढवता येणार नव्हती. परिणामी तो शर्यतीतून आपोआपच बाद ठरला. उर्वरित तिघांचे वय कमी होते. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी योग्य उमेदवार उपलब्ध नसल्याने काही महिन्यांपूर्वी झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुका लांबणीवर टाकाव्या लागल्या होत्या. या स्थितीत सरपंच म्हणून ग्रामस्थांचे लक्ष अनुसूचित जाती-जमातीमधील सांवरलाल या तरुणावर खिळले होते. कारण उर्वरित तिघांमध्ये तोच सर्वात आधी वयाची २१ वर्षे पूर्ण करणार होता व तो आठवी पासदेखील आहे. आता गावात ग्रामपंचायतीची १२ जुलै रोजी पोटनिवडणूक होणार असून त्यानंतर सांवरलालची सरपंच म्हणून बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.
सरपंच साहेब म्हणून गावात रुबाब
सांवरलालने सात वर्षांपूर्वीच शिक्षण सोडले. तो खलाशी म्हणून काम करत होता. ग्रामपंचायत निवडणुकीआधी त्याला गावात फारसे महत्त्व नव्हते किंवा कुणी आवर्जून बोलत नव्हते. आज सगळे गाव त्याच्या पुढेमागे फिरत असून त्याला सलाम करत आहे. गावातील वयोवृद्ध नागरिकही त्याला आतापासूनच सरपंचसाहब म्हणत आहेत. सांवरलालचे वडील नाथुलाल व आई भुरीदेवी मनरेगाचे मजूर आहेत.

मोठा भाऊ लक्ष्मण गावात एकाच्या ट्रॅक्टरवर चालक आहे, तर छोटा भाऊ हनुमान बक-या चारतो.
सरकारी नियमामुळे सामाजिक बदल एसटीसाठी पहिल्यांदाच येथील जागा आरक्षित झाल्यानंतर गावात अनेक वर्षे सरपंचच होऊ शकला नाही. तेव्हा लोकांना शिक्षणाचे महत्त्व समजले. आता अनुसूचित जमातीमधील लोक मुलांना शिकवू लागले आहेत. राजस्थानात सरपंच होण्यासाठी आठवी पास व घरात शौचालय अनिवार्य आहे.