आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रौर्याची परिसीमा, 9 महिन्यांच्या चिमुरडीवर भावाचा बलात्कार, बालिका अत्यवस्थ!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आग्रा - देशभरात महिलांवर बलात्काराच्या एकापाठोपाठ येणा-या बातम्यांमध्ये एक अत्यंत खळबळजनक आणि तेवढीच हृदयद्रावक बातमी आली आहे. एका नऊ महिन्यांच्या चिमुरडीवर तिच्याच चुलत भावाने बलात्कार केल्याचा हा प्रकार आग्र्यापासून 180 किलोमीटरवर असणा-या संभाल जिल्ह्यातील दादरोली गावातील आहे. मात्र या प्रकरणानंतर पीडितेच्या आई-वडीलांनी पोलिसात तक्रार करणे टाळले आहे. मुलीच्या वडीलांनी तिला अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये एका खासगी रुग्णालयात दाखल केले. फिरोजाबाद येथील या रुग्णालयात गुरुवारी रात्री मुलीवर उपचार सुरू करण्यात आले.
अत्यंत क्रूरपणे या बालिकेवर बलात्कार करण्यात आला होता, त्यामुळे लगेचच या बालिकेच्या गुप्तांगावर प्लास्टीक सर्जरी करावी लागल्याचे, या बालिकेचे उपचार करणा-या डॉ. गीता यादव यांनी सांगितले.
या घटनेनंतर पीडितेचे वडील रात्रभर रडत होते. बायको आणि नातेवाईकांनी आणलेल्या दबावामुळे पीडित बालिकेच्या वडीलांना पोलिसांत तक्रार केली नाही. पण त्यामुळे स्वतःच्या मुलीलाच न्याय मिळवून देऊ शकलो नसल्याचा संताप ही व्यक्ती रात्रभर करत होती, असे रुग्णालयातील एका कर्मचा-याने सांगितले.
या घटनेनंतर पोलिसही याठिकाणी हजर झाले. त्यांना जेव्हा पूर्ण प्रकरण समजले तेव्हा पोलिसही स्तब्ध झाले होते. मात्र, प्रकरण आपल्या हद्दीत येत नसल्याचे सांगत पोलिसांनी त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला. बलात्कार झाल्याचे स्पष्ट असून आम्ही पालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिस अधिका-यांनी स्पष्ट केले आहे.
पीडितेवर उपचार सुरू असलेल्या रुग्णलयातील डॉक्टरांना माध्यमांनी याबाबत पोलिसांना का कळवले नाही, असा सवाल केला. त्यावर अशा प्रकारच्या माध्यमांच्या दबावामुळेच रुग्णालये अशा रुग्णावर उपचार करण्यास धजावत नाहीत, अशा शब्दांत माध्यमांवर डॉक्टरांनी राग व्यक्त केला.