आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 9 Thousand Crores Declare To Science Research By Prime Minister Manmohan Singh

विज्ञान संशोधनासाठी 9 हजार कोटींची मनमोहन सिंग यांच्याकडून घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - विज्ञान संशोधन आणि विकासासाठी मोठी चालना देत पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी सोमवारी 9 हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या प्रकल्पाची घोषणा केली. या प्रकल्पांतर्गत तामिळनाडूमध्ये अत्याधुनिक कॉम्प्युटिंग मिशन व वेधशाळा स्थापन केली जाईल.
विज्ञान क्षेत्रात भारताचा महत्त्वपूर्ण सहभाग राहावा यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. युरोपची अणुसंशोधन संस्था ‘सर्न’शी भारत जोडला असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. भारतीय विज्ञान परिषदेत ते बोलत होते. संशोधन आणि विकासाच्या काही क्षेत्रांत भारताने नेतृत्व करावे. स्वस्तातील नवीन उपक्रम, चिरंतन कृषी विकास, क्लीन एनर्जी आणि पाण्याशी संबंधित काही क्षेत्रांत भारत जगाचे नेतृत्व करू शकेल.
नॅशनल मिशन ऑन हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंगसाठी 4500 कोटी रुपये, तर भौगोलिक माहितीच्या राष्‍ट्रीय केंद्रासाठी 3000 कोटी रुपये गुंतवणूक केली जाईल. भारत काही जागतिक संशोधन प्रकल्पात सहभागी होणार आहे. तामिळनाडूत 1450 कोटी रुपये खर्चातून न्यूट्रिनो आधारित वेधशाळा स्थापन केली जात आहे. पर्यावरणास धोका पोहोचण्याची भीती व्यक्त करत निलगिरीमध्ये वेधशाळेस विरोध करण्यात आला होता. यामुळे आता हा प्रकल्प पश्चिम बोदी हिल्समध्ये स्थापण्यात येणार आहे.
पाच दिवसांच्या परिषदेच्या उद्घाटनास केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री एस. जयपाल रेड्डी आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला उपस्थित होते. परिषदेत देश-विदेशातील 500 शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत. यामध्ये ली वाय. टी. आणि फेरीद मुराद या नोबेल पुरस्कार विजेत्यांचा समावेश आहे. माजी राष्‍ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार अविनाश चांदर यांचे व्याख्यान होणार आहे.