आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 9 Year Old Cancer Patient Chandan Became Pilot For One Day

कर्करोगाशी झुंज देणारा नऊ वर्षांचा चंदन एक दिवसासाठी बनला फायटर पायलट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाला (हरियाणा) - ज्या लढाऊ विमानांना आकाशात उडताना पाहिले, त्याच विमानात बसण्याचे स्वप्न वाढदिवसाच्या दिवशी- १३ नोव्हेंबरला साकार झाले. त्यासाठी हवाई दल आणि उदय फाउंडेशनचा मनापासून आभारी आहे, हे शब्द आहेत नऊ वर्षांच्या चंदनचे. त्याला हाडाचा कर्करोग आहे. त्याने २० वेळा किमोथेरपीच्या वेदना सहन केल्या आहेत. अजूनही फायटर पायलट बनण्याची त्याची इच्छा असल्याचे चंदनने सांगितले.

चंदन मूळचा बिहारमधील समस्तीपूरचा. तीन वर्षांपूर्वी आई-वडील त्याला दिल्लीतील एम्समध्ये घेऊन आले होते. तेथे डोक्यावर छत मिळाले नाही. म्हणून त्यांना रस्त्यावर आणि उघड्यावर राहावे लागले होते. त्या वेळी आकाशात उडणारी विमाने पाहताना चंदनच्या मनात पायलट होण्याची इच्छा निर्माण झाली. घरी असताना विमानाचा आवाज येताच तो बाहेर येऊन आकाशाकडे एकटक विमान आेझरते होईपर्यंत पाहत असे. मुलाची ही इच्छा पाहून त्याच्या आईने उदय फाउंडेशनला एक पत्र पाठवले होते. त्यानंतर हवाई दलाने विलंब न करता चंदनला अधिका-याचा पोषाख परिधान करायला लावला. सलामी दिली आणि विमानात पायलट म्हणून बसवले. एकेदिवशी थंडीच्या रात्री गरजूंना शाल वाटप करताना माझी चंदनशी भेट झाली. त्याच्याशी बोलल्यानंतर त्याला आजार असल्याचे समजले; परंतु त्याची पायलट होण्याची इच्छा होती.

प्रशिक्षण घेतले
ज्या जग्वार लढाऊ विमानाला चंदनने पाहिले होते. त्याच विमानात तो आजारपण असूनही बसला. त्यासाठी रीतसर प्रशिक्षणही घेतले. १३ नोव्हेंबरला त्याचा वाढदिवस होता. त्यानिमित्त त्याला हवाई दलाकडून एक सुंदर भेट मिळाली.