आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेन्नईत 34 दिवसांत 93% जास्त पाऊस, 8 मृत्यू; तामिळनाडूच्या चार जिल्ह्यांत मुसळधार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- तामिळनाडूत सलग सहाव्या दिवशीदेखील संततधार पाऊस सुरू होता. राज्यातील इतर भागांना शनिवारी पावसाने झोडपून काढले. बंगालच्या उपसागरातील दबाव क्षेत्रामुळे हा पावसाचा राज्यात मुक्काम वाढला आहे. केवळ आठ दिवसांत हंगामातील तीन तृतीयांश पाऊस झाला आहे. पावसामुळे विविध घटनांत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला. गतवर्षीच्या ऑक्टोबर ते  ४ नोव्हेंबरच्या तुलनेत यंदा ९३ टक्के जास्त पाऊस झाला.   

पावसाने झोडपून काढलेल्या प्रदेशातील बस, रेल्वे सेवा शनिवारीदेखील ठप्प झाली होती. अनेक ठिकाणी रेल्वे गाड्या विलंबाने धावल्या. त्यामुळे प्रवासी तसेच चाकरमान्यांचे हाल झाले. राज्यात पावसाने थैमान घातल्यामुळे ३१ ऑक्टोबरपासून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. विद्यापीठाच्या अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पुद्दुचेरीला पावसाने झोडपून काढले आहे. गेल्या चोवीस तासांत किनारपट्टीवरील प्रदेशांतील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. चेन्नईत ६ सेंमी, मीनाबक्कममध्ये ७ सेंमी पावसाची नोंद झाली. मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी शुक्रवारी पूरग्रस्त भागाला भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला.  
 
१० हजारांवर लोक मदत छावणीत
चेन्नईसह तिरुवल्लूर व नागापट्टीणम, कांचिपुरम जिल्ह्यांत १०० वर मदत छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. शनिवारी १० हजार ६४० नागरिकांना घरेदारे सोडून तात्पुरत्या निवाऱ्यासाठी ११४ छावण्यांत आश्रयाला जावे लागले आहे. कुटुंबकबिल्यासह लोक या छावण्यात आले आहेत. चारही जिल्ह्यांत पाणीच पाणी झाले आहे. अनेक गावांना पुराने वेढले आहे. चेन्नईमधील पूरग्रस्त भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी बोटींची मदत घेतली जात आहे. त्याशिवाय सखल भागातील पाणी काढण्यासाठी जेनसेटचाही वापर केला जात आहे. जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सरकारने केले आहे. सरकारी यंत्रणेकडून सर्व परिस्थितीवर बारकाईने निगराणी ठेवली जात आहे, असे सूत्रांनी सांगितले.
 
अन्नाची पाकिटांचा पुरवठा 
पूरग्रस्त भागात बचाव पथकाने व्यापक पातळीवर मदत पुरवण्यास सुरुवात केली आहे. कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना अन्नाची पाकिटे आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला. 
 
बातम्या आणखी आहेत...