आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक दिवा विनोदसाठी...मोहिमेचे जगभर कौतुक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगड - ९४.३ माय एफएमने आपल्या एका मोहिमेच्या माध्यमातून जगभरातून कौतुकाची थाप मिळवली आहे. एक रिक्षा चालवणार्‍या माणसाच्या मुलाचे डोळ्यांचे ऑपरेशन करावयाचे होते. यासाठी पैसे उभे करण्यासाठी माय एफएमने "एक दिवा विनोदसाठी' ही मोहीम चालवली होती. या मोहिमेला न्यूयॉर्क रेडिओ फेस्टिव्हलमध्ये कांस्य पदक मिळाले.

चंदिगडचे आरजे जस्सी, मीनाक्षी, गगन व मानव यांनी रेडिओवर ही मोहीम चालवली होती. गेल्या दिवाळीत या चौघांनी आपल्या हातांनी दिवे तयार करून लोकांना किमान एक दिवा तरी विनोदच्या ऑपरेशनसाठी खरेदी करावा, असे आवाहन केले होते. या आवाहनाला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि या पैशातून विनोदच्या डोळ्याचे ऑपरेशन करण्यात आले.

या मोहिमेचे केवळ चंदीगडमध्येच नव्हे, जगभर कौतुक झाले. दरवर्षी घेतल्या जाणार्‍या न्यूयॉर्कच्या प्रतिष्ठित रेडिओ फेस्टिव्हलमध्ये या मोहिमेला पारितोषिक मिळाले. या फेस्टिव्हलमध्ये ३२ देशांतील रेडिओ स्टेशन्सनी सहभाग घेतला होता.
बातम्या आणखी आहेत...