आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारित्र्याच्या संशयावरुन नववीच्या विद्यार्थ्याने केली गर्लफ्रेंडची हत्या, 4 दिवस होते सोबत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची (झारखंड)- चान्हो परिसरातील एका हायस्कूलच्या होस्टेलमध्ये एका विद्यार्थ्याने प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेऊन गळा दाबून हत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कौटुंबीक कलहांवरुन लग्न झालेल्या दांपत्यांमध्ये असे प्रकार घडत असतात. पण चक्क नववीच्या विद्यार्थ्याने असा गुन्हा केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे गर्लफेंड त्याच्या हॉस्टेलवर आली होती. यावेळी तिने कबुल केले की तिचे आणखी एका मुलासोबत संबंध आहेत. त्यानंतर रागात आलेल्या या विद्यार्थ्याने तिची गळा दाबून हत्या केली.
30 ऑक्टोबरपासून गर्लफेंड होती हॉस्टेलमध्ये
30 ऑक्टोबरपासून विद्यार्थ्याने गर्लफ्रेंडला हॉस्टेलच्या खोलीत ठेवले होते. त्यानंतर काल दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. विद्यार्थ्याने तिला दुसऱ्या तरुणासोबत संबंध असल्यासंदर्भात जाब विचारला होता. तिनेही याची कबुली दिली होती, असे या विद्यार्थ्याने सांगितले. त्यानंतर त्याने तिची गळा दाबून हत्या केली. हे प्रकरण लपविण्यासाठी तिचा मृतदेह दोरीच्या मदतीने छताला टांगला. तिने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे मित्रांना सांगितले. त्यानंतर त्याच्या मित्रांनी याची माहिती शिक्षकांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी घेऊन या विद्यार्थ्याला अटक केली. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने घडलेला गुन्हा कबुल केला.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेशी संबंधित फोटो....काय म्हणाले या होस्टेलचे रेक्टर...
बातम्या आणखी आहेत...