आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'हे\' मेसेज व्हायरल झाल्याने घाबरले भारत सरकार, रस्त्यावर उतरवली पोलिस फोर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर व्हायरल मेसेजमुळे आज 'भारत बंद' आहे. असे यामुळे म्हटले जात आहे कारण रस्त्यांवर पोलिस फोर्स तैनात आहे. अनेक शहरांतील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. गृह मंत्रालयानेही राज्यांना सुरक्षा वाढवण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. परंतु आतापर्यंत कोणत्याही मोठ्या संघटनेने भारत बंदची जबाबदारी घेतलेली नाही. फक्त सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर व्हायरल मेसेजने भारत बंदचे वातावरण तयार केले. ज्यामुळे सरकारही भ्यायले. तथापि, 2 एप्रिल रोजी दलित संघटनांनी भारत बंद पुकारला होता. यादरम्यान 12 राज्यांत हिंसा झाली. 15 जणांचा मृत्यू झाला. यानंतर 10 एप्रिल रोजी भारत बंदशी संबंधित मेसेज व्हायरल होऊ लागले.


हिंसा झाल्यास कलेक्टर-एसपी असतील जबाबदार
- गृहमंत्रालयाने स्पष्ट केले की, कुठेही हिंसा किंवा अप्रिय घटना झाली तर त्यासाठी सर्वस्वी त्या परिसरातील डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट (डीएम) आणि पोलिस अधीक्षक (एसपी) यांना जबाबदार धरले जाईल.

 

ग्वाल्हेर-भिंडमध्ये शाळा-कॉलेज बंद 
- मध्य प्रदेशात पोलिसांनी अलर्ट जारी केलेला आहे. ग्वाल्हेर आणि भिंड जिल्ह्यात कर्फ्यू लावण्यात आला आहे. येथे मंगळवारी शाळा-कॉलेजेस बंद असतील.
- इंटरनेटही 48 तासांपर्यंत बंद करण्यात येईल. भोपाळमध्ये कलम 144 लावण्यात आले आहे.
- सोमवारी भोपाळ, ग्वाल्हेरसहित प्रदेशातील सर्व भागांमध्ये कमिश्नर आणि आयजींची संयुक्त बैठक झाली. यात कलम 144 लागू करणे, सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्यास तत्काळ कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

अनेक ठिकाणी कलम 144 लागू
- हिंसेची शक्यता पाहून राजस्थानच्या भरतपूरमध्ये कलम 144 लावण्यात आले आहे. इंटरनेट सर्व्हिस बंद करण्यात आली आहे.
- दुसरीकडे, उत्तराखंडच्या नैनीतालमध्येही कलम 144 लागू आहे. धरणे-निदर्शने करणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, कोण-कोणते मेसेजेस व्हायरल झाले...

बातम्या आणखी आहेत...