आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • निम्म्या किमतीत मिळेल स्कूटी, स्मार्टफोन लॅपटॉप अगदी मोफत: कर्नाटकसाठी काँग्रेसची 10 मोठी वचने 10 Big Point Congress Manifesto In Karnataka

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निम्म्या किमतीत मिळेल स्कूटी, स्मार्टफोन-लॅपटॉप अगदी मोफत: कर्नाटकसाठी काँग्रेसची 10 मोठी वचने

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - पुढच्या महिन्यात होऊ घातलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 52 पानांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात काँग्रेसने मुख्यत्वे शेतकरी आणि तरुणांवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. काँग्रेसच्या निवडणूक घोषणापत्रातील सर्वात मोठी बाब 18 ते 23 वर्षे वयाच्या तरुणांसाठी स्मार्टफोन देण्याची आहे. असेच वचन यूपीच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाने दिले होते. तरुणांसोबत काँग्रेसचा फोकस शेतकऱ्यांवरही आहे. इंटरनेटची वाढती गरज पाहून काँग्रेसने ग्रामपंचायतींमध्ये सायबर कॅफे उघडण्याचेही निवडणूक जाहीरनाम्यात लिहिले आहे. 


एक नजर काँग्रेसच्या 10 मोठ्या वचनांवर
1) 18 ते 23 वर्षे वयाच्या तरुणांसाठी स्मार्टफोन.
2) सर्व कॉलेज- विद्यापीठांत फ्री वाय-फाय.
3) 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना फ्री लॅपटॉप आणि इंटरनेट.
4) बारावीपर्यंत शिक्षण मोफत, मुले आणि मुली दोन्हींसाठी.
5) महिलांनी स्कूटी खरेदी केल्यास 50 टक्के सबसिडी किंवा 30 हजार रुपये.
6) दरवर्षी 15 ते 20 लाख लोकांना नोकरी.
7) पुढच्या 5 वर्षांत एक कोटी नोकऱ्या देण्याचे वचन.
8) प्रत्येक गावात इंदिरा शहरात राजीव क्लिनिक.
9) ग्रामपंचायतींमध्ये सायबर कॅफेची सुविधा उपलब्ध केली जाईल.
10) राज्यात सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी शेती 100 टक्के कीटकनाशक मुक्त.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी फोटो... 

बातम्या आणखी आहेत...