आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • बँकेचे 10 लाख कर्मचारी आजपासून संपावर 10 Lakh Bank Employees Strike On May 30 And 31

बँकेचे 10 लाख कर्मचारी आजपासून संपावर, वेतनात फक्त 2% वाढीच्या प्रस्तावाला विरोध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
- बँक कर्मचारी 2% वाढीच्या प्रस्तावाला खोडसाळपणा म्हणत आहेत.
- आधी बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनात 15% पर्यंत वाढ करण्यात आली होती.

 

मुंबई - देशभरातील 10 लाखांहून जास्त बँक कर्मचारी बुधवारपासून 2 दिवसांपासून संपावर आहेत. हे सर्व इंडियन बंक असोसिएशन (आयबीए) कडून वेतनात फक्त 2% वाढीला विरोध करत आहेत. तथापि, 5 मे रोजी या मुद्द्यावर झालेल्या बैठकीत आयबीएने हा प्रस्ताव दिला होता. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, वेतनात 2% वाढीला काहीही अर्थ नाही. 30 आणि 31 मेच्या संपामुळे या महिन्याच्या पगारांवर परिणाम होऊ शकतो. एटीएम ट्रान्झॅक्शनही प्रभावित होऊ शकतात.

 

बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या?
- वेतन निश्चितीची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जावी.
- वेतन-भत्त्यांमध्ये योग्य वाढ केली जावी.
- सर्व ग्रेडच्या अधिकाऱ्यांचा समावेश केला जावा. 
- इतर सेवाशर्थींमध्ये सुधारणा केली जावी.

- या मागण्यांवरून युनाइटेड फोरम ऑफ बँक युनियन्स आणि आयबीएदरम्यान 2 मे 2017 पासून 12 नोव्हेंबर 2017 दरम्यान 13 बैठका झाल्या होत्या. नुकतीच 5 मे रोजी या मुद्द्यावर शेवटची चर्चा झाली आहे. बँक कर्मचाऱ्यांची वेतनवाढ मागच्या वर्षीच्या नोव्हेंबरपासून पेंडिंग आहे.

 

बँकेत दोन दिवस कामबंद
- युनाइटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या बॅनरखाली हा संप होत आहे. या फोरमशी देशभरातील 9 बँक युनियन जोडलेल्या आहेत. यात एसबीआयसहित इतर सरकारी बँकांचे 10 लाख कर्मचारी आणि अधिकारी सामील आहेत. बुधवारी सकाळी 6 वाजेपासून 1 जूनच्या सकाळपर्यंत बँक कर्मचारी काम करणार नाहीत. यामुळे बँकिंग सेवांवर परिणाम होऊन ग्राहकांना मनस्ताप होऊ शकतो.

 

मागच्या वेळी 15% वाढ, या वेळी फक्त 2% का?
- 1 नोव्हेंबर 2012 पासून 31 ऑक्टोबर 2017 पर्यंत बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनात 15% पर्यंत वाढ करण्यात आली होती. अशा वेळी बँक कर्मचारी 2% वाढीच्या प्रस्तावाला खोडसाळपणा म्हणत आहेत. आईबीएने असेही म्हटले की, अधिकाऱ्यांच्या मागणीवर चर्चा स्केल-III पर्यंतच्या अधिकाऱ्यांपर्यंत मर्यादित राहील.

 

एनपीएमुळे बँकांना तोटा, कर्मचारी जबाबदार नाहीत: युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स
- आयबीएने बँकांच्या तोट्याचे कारण पुढे करत वेतनात 2% वाढीचा प्रस्ताव दिला. बँक कर्मचारी याला चूक असल्याचे सांगत आहेत. त्यांच्या मते सरकारी बँकांचे ऑपरेटिंग प्रॉफिट वाढत आहे, परंतु याच्या 70% एनपीएच्या प्रोव्हिजनिंगमध्ये जात आहे.
- युनाइटेड फोरम ऑफ बँक यूनियन्सचे संयोजक देविदास तुळजापूरकर म्हणाले की, नोटबंदीसहित जन-धन, मुद्रा आणि अटल पेन्शन यासारख्या सरकारी योजनांसाठी मागच्या 2-3 वर्षांत बँक कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेतली आहे. कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण खूप वाढला आहे. 

बातम्या आणखी आहेत...