आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती-पत्नीत तडजोडीसाठी 10 वर्षांच्या मुलाचे पत्र ग्राह्य; सुप्रीम कोर्टाकडून घटस्फोट मंजूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने एका जोडप्यात गेल्या ७ वर्षांपासून सुरू असलेला कौटुंबिक वाद आपसात तडजोड करून घटस्फोटाद्वारे संपुष्टात अाणला. या प्रकरणी अंतिम निर्णय येण्याआधी या जोडप्याच्या दहा वर्षांच्या मुलाने न्यायाधीशांना एक पत्र पाठवले होते. यात मुलाने आई-वडिलांचे गेल्या ७ वर्षांपासून सुरू असलेले भांडण मिटवल्याबद्दल न्यायाधीशांचे आभार मानले आहेत. या प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या न्यायाधीश कुरियन जोसेफ आणि मोहन एम. शांतानागौदर यांनी शुक्रवारी मुलाने पाठवलेले पत्र अंतिम निर्णयात समाविष्ट केले.  


तडजोडीनंतर दिली घटस्फोटास मंजुरी 

सर्वोच्च न्यायालयात दोन्ही पक्ष शुक्रवारी हजर होते. दोघांनी आपसात तडजोड करत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. संपूर्ण प्रकरण वाचून न्यायाधीशांनी घटस्फोटास मंजुरी दिली. यापूर्वी झालेल्या सुनावणीत ज्या प्रकारे न्यायालयाने दोघांतील वाद सोडवले, त्यावरून हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात परत पाठवावे, असे आम्हाला वाटत नसल्याचे न्यायाधीशांनी नमूद केले. दोन्ही पक्ष आमच्यासमोर उपस्थित आहेत. या प्रकरणावर विचार केल्यानंतर, दोघांनी घटस्फोट घ्यावा, या त्यांच्या निर्णयाशी न्यायालय सहमत आहे.  


या दोघांना वैवाहिक वाद सोडवण्यासाठी आवश्यक असलेली सहा महिन्यांची मुदत देण्याची गरज नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. न्यायाधीशांनी त्यांच्या निर्णयात मुलाचे पत्र समाविष्ट केले.  

मुलाने लिहिले : अंधारासाठी प्रकाशाची सोय असते
या पत्रात मुलाने लिहिले, परमेश्वराकडे नेहमी आपल्यासाठी काही ना काही देण्यासारखे असते. प्रत्येक समस्येची गुरुकिल्लीही त्याच्याकडेच असतेे. अंधारासाठी प्रकाशाची सोय असते. प्रत्येक दु:खाचा अंत असतो तर उद्यासाठी एक योजनाही असते.  


२०११ पासून सुरू होता वाद  
घटस्फोट घेणाऱ्या दांपत्याचा विवाह मे १९९७ मध्ये झाला होता. दोघांना दोन मुले आहेत. वैवाहिक संबंध ठीक नसल्याने दोघेही २०११ पासून विभक्त राहत होते. यानंतर नात्यातील अंतर वाढत गेेले. त्यांनी एकमेकांवर गुन्हेही दाखल केलेले होते. कनिष्ठ न्यायालयांनंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेेले. सर्वोच्च न्यायालयाने प्रथम दोघांत तडजोड घडवण्यासाठी एका मध्यस्थाची नियुक्ती केली. पण त्यालाही अपयश आले.

 

बातम्या आणखी आहेत...