आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Python Attack: अजगराच्या जबड्यात होती 10 वर्षीय मुलगी; धाडसी गावकऱ्यांनी असे वाचवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची - झारखंडचे पर्यटन स्थळ कुलवे टोंगरी येथे रविवारी एक मोठी हानी टळली. या गावात एका अजगराने 10 वर्षीय चिमुकलीला आपल्या जबड्यात धरले होते. त्या मुलीच्या किंचाळ्या ऐकूण ग्रामस्थ गोळा झाले. स्थानिकांनी सांगितल्याप्रमाणे, किरण नावाची ही मुलगी आपल्या बकऱ्या घेऊन कुरणात गेली होती. तसेच बकऱ्या चरायला सोडून एका दगडावर बसली होती. त्याचवेळी 10 फुट अजगराने तिच्यावर अचानक हल्ला केला. काही कळण्यापूर्वीच अजगराने तिला घट्ट पकडले आणि जबडा उघडून पायापासून गिळण्यास सुरुवात केली. घटनास्थळी काही लहान मुले सुद्धा धावून आले होते. इतके भयावह दृश्य पाहून त्यांनी सुद्धा ओरडण्यास सुरुवात केली. परंतु, काही धाडसी गावकऱ्यांच्या मध्यस्थीने त्या मुलीला अजगराच्या जबड्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. 

 

विहिरीत फेकला अजगर
अजगराने किरणला तिच्या पायापासून जबड्यात पकडले होते. तसेच तिला गिळण्याचा प्रयत्न करत होता. लोकांनी तिला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. तरीही तिचे पाय आत असल्याने अजगराच्या दातांनी ती जखमी झाली आहे. त्या मुलीला तातडीने रांची इंस्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर अजगराला गावकऱ्यांनी उचलून एका विहिरीत फेकले आहे. जोपर्यंत पीडित व्यक्ती पूर्णपणे बरी होत नाही. तोपर्यंत त्या साप किंवा अजगराला मारले जात नाही अशी ग्रामस्थांची मान्यता आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...