आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात मोठी IT Raid : 100 किलो सोने, 163 कोटी रोख जप्त, पार्किंगमधील कारमध्ये होती कॅश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तमिळनाडू - इनकम टॅक्स डिपार्टमेंटने मदुराई येथील एका कंत्राटदाराच्या कंपनीवर टाकलेल्या धाडीत जवळपास 100 किलो सोन्याची बस्किटे आणि 163 कोटी रुपये रोख जप्त केले आहेत. चेन्नईतील रस्ते कंत्राटदार नागराजन सय्यदुरई यांच्या एसकेजी ग्रुप कंपनीवर ही धाड टाकण्यात आली. कंपनीच्या 20 वेगवेगळ्या ठिकाणांवर धाड टाकण्यात आली. सोमवारी पहाटे सुरू झालेली ही कारवाई अजूनही सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. 


रोख रकमेचा हिशेब नाही
इनकम टॅक्स डिपार्टमेंटला धाडीमध्ये मिळालेले सोने आणि रोख रकमेपैकी बहुतांश संपत्ती ही बेहिशेबी असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली आहे. अधिकारी म्हणाले की, या पैशाचा काही हिशेब असण्याची शक्यता नाही. विशेष म्हणजे रोख पैसे पार्किंगमध्ये असलेल्या कारमध्ये ट्रॅव्हल बॅगमध्ये भरून ठेवलेले होते. 


रस्त्यांची कामे करणारी कंपनी 
इनकम टॅक्स विभागाने ज्या कंपनीच्या कार्यालयांवर धाडी टाकल्या आहेत ती कंपनी सध्याच्या राज्य सरकारसाठी रस्ते आणि हायवे तयार करण्याचे काम करते. अधिकाऱ्यांच्या मते मंगळवारीही या धाडींचे सत्र सुरुच राहणार आहे. या प्रकरणात जप्तीच्या रकमेचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. कंपनीच्या काही घोटाळ्यांचा प्रकारहील यातून समोर येण्याची शक्यता आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...