आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भिलाई (छत्तीसगड) - शहरच्या सेक्टर-4 मध्ये सोमवारी संध्याकाळी 10वीच्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. एका दिवसापूर्वीच तिला घरी यायला उशीर झाल्याने वडील रागावले होते. आईनेही बोलणे बंद केले होते.
असे आहे प्रकरण..
- वंशिकाचे वडील संजीव दुबे आणि आई नोकरी करतात. ते ऑफिसमध्ये गेल्यानंतर वंशिका शेजारी राहणाऱ्या आपल्या आजोबा-आजीच्या घरी जायची.
- दर दिवशीप्रमाणे सोमवारीही ती शाळेतून घरी परतल्यानंतर आजोबा-आजींच्या घरी गेली.
- दुपारी तिला तिची एक मैत्रीण भेटायला आली. दोघांमध्ये गप्पा झाल्या. त्यादरम्यान तिने मोबाइलमधून सोबत सेल्फीही काढली. मैत्रीण गेल्यानंतर ती वरच्या रूममध्ये गेली.
- संध्याकाळी 4 वाजताही परत आली नाही. आधी तर आजोबा-आजीला वाटले की, वंशिका झोपलेली असेल, पण जरा जास्तच वेळ होऊनही ती खाली न उतरल्याने ते तिला पाहायला गेले.
- दार आतून बंद होते. ठोठावल्यानंतरही ते उघडले नाही तेव्हा कुटुंबातील इतर सदस्यांच्या मदतीने त्यांनी धक्का देऊन उघडले. आत वंशिकाने पंख्याच्या रॉडला गळफास लावलेला होता.
वडील रागावले म्हणून...
एका दिवसापूर्वीच रविवारी संध्याकाळी वंशिका काही कामानिमित्त बाहेर गेली होती. परतायला तिला उशीर झाला. यामुळेच वडील नाराज झाले आणि ते तिला रागावले. वंशिका घरी उशिरा आल्याची माहिती मिळाल्यावर आईनेही तिच्याशी बोलणे बंद केले. यामुळेच चिडून वंशिकाने आत्महत्या केली.
पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.