आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Molestation: झोपेतून घाबरून उठली चिमुकली; आईला म्हणाली, काका करतात घाणेरडे कृत्य, मला वाचव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदीगड - अवघ्या 11 वर्षांची मुलगी रात्री झोपेतून अचानक घाबरून उठली. तिचे हात-पाय थरथरत होते. तसेच अंग घामाघूम आणि रडणे काही थांबतच नव्हते. आईने आपल्या कुशीत घेऊन वारंवार विचारले तेव्हा तिने धक्कादायक खुलासा केला. 40 वर्षांचा सख्खा काका एकट्यात आपल्यासोबत गलिच्छ कृत्य करतो. त्याने असे एकदा नव्हे तर अनेकवेळा केले. सोबतच, याबाबत कुणाशी बोलल्यास जिवे मारणार अशी धमकी द्यायचा. एवढे बोलून तिने पुन्हा आई मला वाचव म्हणत हंबरडा फोडला. यानंतर आईने पोलिस स्टेशन गाठले. त्या नराधमाला अटक करून त्याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


तीन वेळा केला अत्याचार
> तिचे वडील एका खासगी कंपनीत नोकरी करतात. आईने सांगितल्याप्रमाणे, शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ही चिमुरडी अचानक झोपेतून उठून रडत होती. तसेच डोळे बंद ठेवून मला वाचवा, वाचवा अशी ओरडत होती. आवाज ऐकूण आईला राहावले नाही आणि लाडाने वारंवार विचारल्यानंतर अखेर तिने आपबिती सांगितली.
> काउंसलिंगमध्ये मुलीने सांगितल्याप्रमाणे, तिच्या काकाने आतापर्यंत तीन वेळा तिच्यासोबत वाइट कृत्य केले. ती एका संयुक्त कुटुंबात राहत असल्याने तिचा काका एकाच घरात राहत होता. तीन महिन्यांपूर्वी घरात कुणी नसताना नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. 
> यानंतर तिला एकट्यात पकडून अत्याचार करायला लागला. गेल्या महिन्यातच त्याने तिच्यावर तिसऱ्यांदा रेप केला होता. पोलिसांनी रात्री उशीराच त्या मुलीला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवले आणि रिपोर्ट तयार करून कारवाईला लागले. 


धमक्यांमुळे मानसिक धक्क्यात

पीडित मुलगी 7 व्या वर्गात शिकत आहे. आपल्यावर झालेल्या अत्याचारामुळे तिला मोठा मानसिक धक्का बसला आहे. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, तज्ञ डॉक्टर आणि मानसोपचार तज्ञांकडून लवकरात लवकर तिच्यावर उपचार केला जाईल. तिचे आई-वडील सुद्धा तिला या धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी धडपडत आहेत. आरोपीने तिला शांत न राहिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळेच ती रात्री बेरात्री घाबरून झोपेत बड-बड करायची. पोलिसांनी केलेल्या चौकशीनुसार, आरोपी काहीच काम करत नाही. 

बातम्या आणखी आहेत...