आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IG Office ला पोहोचली 120 वर्षांची आई; म्हणाली, साहेब... माझ्या मुलाला अटक करा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - येथे मंगळवारी झालेल्या लोक अदालतमध्ये चक्क 120 वर्षांची महिला पोलिस महासंचालकांकडे आपली विनंती घेऊन गेली. साहेब, माझ्या मोठ्या मुलाने मला लुटले रोज मारतो त्याला ताबडतोब अटक करा अशा याचना ती करत होती. नुकतेच त्याने आपल्या आईला पायऱ्यांवरून धक्का दिला. यात तिचे हाड मोडल्याने ती आता चालणे तर दूर बसू शकत नाही. ज्या मुलाला मी हात धरून चालायला शिकवले, पाहा त्याने माझी काय अवस्था केली असे बोलताना तिला अश्रू आवरले नाही.

 

4 मुलांनी घर, पैसे घेऊन हकलून दिले...
- भोपाळच्या बासौदा येथील रहिवासी फूल बाई वन-ट्री हिल्समध्ये आपला लहाना मुलगा लल्लू जोगीसोबत राहत आहे. तोच मुलगा तिला घेऊन मंगळवारी पोलिस महासंचालकांच्या कार्यालयात पोहोचला. आपल्या अर्जात 120 वर्षीय आईने लिहिल्याप्रमाणे पती नगरपालिकेत नोकरीला होते. त्यांच्या निधनानंतर निवृत्ती वेतनाच्या आधारे ती जगत आहे. 
- तिने सांगितल्याप्रमाणे, साहेब, मला 5 मुले आणि 2 मुली आहेत. सर्वात मोठ्या मुलाचे वय 80 तर सर्वात लहाण्या मुलाचे वय 65 वर्षे आहे. इतर चार मुलांनी माझ्या घराचा अनाधिकृत ताबा घेतला आहे. सर्वात मोठा मुलगा सोडू आणि त्याची पत्नी मला रोज मारतात. मारहाण करून माझ्या बँक खात्यातील पैसे काढून घेतात. माझ्या पतीची आयुष्यभराची कमाई, येणारा पेन्शन आणि घर असे सर्व काही त्यांनी लुटले आणि मला घरातून हकलून दिले. त्यांना सगळेच घेऊ द्या. मला त्यांच्याकडून काहीच मिळवण्याची इच्छा सुद्धा नाही. परंतु, त्याने माझ्यावर हात उचलला त्याचेच सर्वात वाइट वाटले. सर्वात लहाण्या मुलासोबत मी राहते त्याचे दोन्ही हात नाहीत. सोबतच पाच मुलांसह आता माझी जबाबदारी सुद्धा आली आहे.


आधार कार्डवर चुकून 81 वर्षे वय
लल्लूने सांगितल्याप्रमाणे, मोठ्या भावाने वयाचा पत्ता लावण्यासाठी डीएनए चाचणी घेतली होती. त्यावरून वय स्पष्ट झाले. तरीही आधार कार्डवर आईचे वय फक्त 81 वर्षे असे नमूद आहे. कारण, आधार कार्डवर जन्म तारीख 1937 पूर्वीची असल्यास ती रेकॉर्डमध्ये येत नाही. आधार कार्ड एक्सपर्ट कुमूद कुमारकर्ण यांनी सांगितल्याप्रमाणे, आधार कार्डच्या सॉफ्टवेअरमध्ये फक्त 99 वर्षांपर्यंत वय टाकता येतो.

बातम्या आणखी आहेत...