आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 13 Year Old Daughter Raped By Father While She Is Sleeping In Amroha Up Latest News

लज्जास्पद: वासनांध बापाने घरात एकट्या असलेल्या मुलीवर केला बलात्कार, नराधमाला अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरोहा (यूपी) - उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये नराधम पित्याने स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर रेप केल्याची लज्जास्पद घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीच्या आईने आपल्या पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून नराधम बापाला अटक केली आहे.

 

असे आहे प्रकरण...

> मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी अल्पवयीन मुलीची आई काही कामानिमित्त आपल्या भावाच्या घरी रामपूरला गेली होती. आई घरातून गेल्यानंतर घरात फक्त बाप आणि त्याची 13 वर्षांची मुलगीच होते. पीडितेने सांगितले की, रात्री ती गाढ झोपेत होती. तेव्हा वासनांध बापाने गाढ झोपेत असल्याचा फायदा घेऊन बलात्कार केला.

 

आरोपी नवऱ्याविरुद्ध पत्नीने घेतली पोलिसांत धाव

> दुसऱ्या दिवशी जेव्हा मुलीची आई घरी परतली तेव्हा बापाच्या पाशवी कृत्याची हकिगत तिने सांगितली. मुलीवर गुदरलेला प्रसंग कळताच आईने पोलिसांत धाव घेऊन आपल्या पतीविरुद्ध तक्रार नोंदवली.

> प्राथमिक चौकशीत समोर आले आहे की, आरोपी बाप मद्यपी आहे. अनेक महिन्यांपासून तो बेरोजगारही होता. पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात पीडितेचे मेडिकल चेकअप केले, ज्यात रेप झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पीडित मुलीनेही आपल्या बापाविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली आहे.

 

अशीच एक घटना... 2 वर्षांपासून सहन करत होती बापाचे अत्याचार

> तथापि, याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हरियाणाच्या कैथलमध्येही अशा प्रकारची घटना समोर आली होती. येथे नराधम बापाने आपल्या अल्पवयीन मुलीला दोन वर्षांपासून वासनेची शिकार बनवत होता. एक दिवशी मध्यरात्री जेव्हा आरोपी आपल्या मुलीला बळजबरी दुसऱ्या रूममध्ये नेऊन रेप करू लागला, तेव्हा मुलीचे ओरडणे ऐकून तेथे तिची आई आली. पत्नी येताच आरोपी फरार झाला.

> सूत्रांनुसार, कैथल जिल्ह्यातील गुहलामधील एका गावात आपल्या कुटुंबासह राहणारी 15 वर्षीय पीड़िता 4 भावाबहिणींत सर्वात मोठी आहे. 8वीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ती घरीच राहत होती. दोन वर्षांपूर्वी एका दिवशी आई बाहेर गेली होती. त्यादरम्यान संधी साधून नराधम बापाने घरात एकटी असलेल्या पोटच्या मुलीवर बलात्कार केला.

> मुलीने दोन वर्षे सख्ख्या बापाकडून होत असलेले अत्याचार सहन केले, कारण नराधमाने धमकी दिली होती की, कुणाला काही कळलं तर जीव घेईन. भीतीमुळे आणि लोकलज्जेमुळे पीडितेने कुणालाच काहीही सांगितले नाही. परंतु त्रास सहन करण्यापलीकडे गेल्यावर तिने आपल्या आईला सर्वकाही सांगितले.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos... 

 

बातम्या आणखी आहेत...