आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्यात 3 मार्चपासून शिगमोत्सव; 2 आठवडे राज्यभर चालणार कार्निव्हल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी - रंग, वेशभूषा आणि संस्कृतीचे उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिगमोत्सवाची सुरुवात 3 मार्चपासून होत आहे. संपूर्ण गोव्यातील गाव आणि शहरांमध्ये 14 दिवस या उत्सवांनी रंगतील. 3 मार्च पासून या उत्सवाची सुरुवात रंगाच्या उधळणणे होणार आहे. यानंतर परेड, पारंपारिक लोक गीत, लोक नृत्य आणि पौराणिक कथांचे दर्शन घडवणाऱ्या पथनाट्यांनी रंगणार आहे. शिगमो गोव्यात दरवर्षी साजरे होणारे सर्वात मोठे हिंदू फेस्टिव्हल आहे. 

 

शिगमोत्सवात घोडे मोडनी आणि फुगडीसह विविध लोक कलांचे दर्शन घडवले जाते. मोठ-मोठा समूह पौराणिक कथा पथनाट्यांच्या स्वरुपात सादर करतात. पर्यटकांसाठी हा उत्सव एक पर्वणीच ठरतो. 14 दिवसांच्या उत्सवाच्या रंगात आणि रोषणाईत समस्त गोवा उजळून दिसतो. सर्वत्र रोषणाई, रंग आणि आतषबाजीचा माहौल असतो. 17 मार्च रोजी धर्बनडोरा येथे उत्सवाचा समारोप होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...