आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजमशेदपूर - झारखंडमध्ये राहणाऱ्या एका 14 वर्षीय मुलीने फासावर लटकून आत्महत्या केली आहे. कारण, एवढेच की ती अभ्यास सोडून मोबाईल वापरत बसली होती. त्यावरून तिच्या वडिलांनी तिला फटकारले होते. ही घटना सोमवारी संध्याकाळी घडली आहे. त्या मुलीचे नाव स्नेहा असून ती केरळ पब्लिक स्कूलमध्ये 8 व्या वर्गात शिकत होती. तिला दोन भाऊ आहेत. घटना घडली त्यावेळी तिचा भाऊ दुसऱ्या खोलीत झोपला होता. तसेच तिची आई बाहेर दूध आणायला गेली होती. दूध घेऊन आई घरी आली तेव्हा दार आतून बंद होते. दार उघडले नसल्याने तिने खिडकीतून आत पाहिले. आतील दृश्य पाहून तिला धक्काच बसला.
एकुलती एक होती स्नेहा
>> वडील अशोक आणि आई अनिता वर्मा यांना दोन मुले आणि एकुलती एक मुलगी स्नेहा होती. घरात फक्त तिचा छोटा भाऊ होता तोही दुसऱ्या एका खोलीत झोपला होता. आई दुकानावर दूध आणायला गेली होती. दुसरा भाऊ ट्युशनला गेला होता. तसेच वडिल कामावरून परतले नव्हते. संध्याकाळी आईनेच घरात प्रथम आपल्या मुलीला फासावर लटकलेल्या अवस्थेत पाहिले.
>> तिने वेळीच आरडा-ओरड करून लोकांना गोळा केले. स्थानिकांच्या मदतीने तिला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यापूर्वीच तिला मृत घोषित केले. एकुलत्या एक मुलीच्या मृत्यूने आई-वडिलांचे रडून हाल झाले आहेत. तिचा मोठा भाऊ राहुलने सांगितल्याप्रमाणे, ती अभ्यास सोडून सकाळी मोबाईल वापरत होती. तेच पाहून वडिल तिच्यावर रागावले होते. परंतु, त्यावरून ती आत्महत्याच करेल असे कुणालाही वाटले नव्हते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.