आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10वीतील मुलाने आई-बहिणीची क्रिकेट बॅटने मारून केली हत्या, अभ्यासासाठी रागवायचे कुटुंबीय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोएडा - ग्रेटर नोएडामध्ये आई-बहिणीचा खून करून फरार झालेल्या मुलाला दोन दिवसांनी शुक्रवारी बनारसमध्ये अटक करण्यात आली. पोलिस सूत्रांनुसार, त्याने आपल्या आई आणि बहिणीचा खून केल्याचे कबूल केले आहे. नोएडा पोलिस शनिवारी दुपारी हत्याकांडाचा खुलासा करणार आहेत. आरोपीला जुवेनाइल कोर्टात सादर केले जाईल. आरोपी मुलाने बॅटीने बेदम मारून डबल मर्डर केल्याचे सांगितले.


क्राइम फायटर गेमच्या व्यसनामुळे झाला मर्डर
- पोलिसांच्या मते, डबल मर्डरच्या आरोपी मुलाने प्राथमिक चौकशीत क्राइम फायटर गेमला हत्येमागचे कारण सांगितले आहे. त्याने बॅटीने बेदम मारून दोघींचा खून केला होता. 
- दोन दिवसांपूर्वी मुलगा बेपत्ता असल्याने कुटुंबीयांनी त्याला घरी परत येण्याचे जाहीर आवाहन केले होते. मुलाचे वडील आणि आजोबा म्हणाले की, तो आपल्या आई आणि बहिणीची हत्या करू शकत नाही.
- पोलिस सूत्रांनुसार, या आवाहनानंतर शुक्रवारी आरोपी अल्पवयीन मुलाने एका अनोळखी क्रमांकावरून वडिलांना फोन केला. त्याच लोकेशनच्या आधारे त्याला बनारसच्या दशाश्वमेध घाटावरून पकडण्यात आले.

 

केव्हा आणि कुठे झाली होती हत्या?
- येथे गौर सिटी 2च्या फ्लॅट क्र. 1446 मध्ये मंगळवारी रात्री अंजली अग्रवाल (42) आणि मुलगी मणिकर्णिका (9) यांचे मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळले होते. जवळच रक्ताने माखलेली एक बॅट पडलेली होती. परंतु घरातील 15 वर्षीय मुलगा मात्र बेपत्ता होता.
- पोलिसांच्या मते, सीसीटीव्ही फुटेजमध्ये सोमवारी रात्री 8 वाजता आरोपी मुलगा आई आणि बहिणीसोबत फ्लॅटमध्ये जाताना दिसत होता. यानंतर शेवटचा रात्री 11.30 वाजता तो एकटाच फ्लॅटबाहेर येताना दिसला.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, प्रकरणाशी संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...