आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 वर्षीय बालिकेवर 7 महिन्यांपासून 18 जण करत होते गँगरेप, आरोपींमध्ये सिक्युरिटी गार्ड, प्लंबर अन् वॉटर सप्लायरही सामील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई -  चेन्नईच्या अयानवरम परिसरात 11 वर्षीय बालिकेवर सामूहिक बलात्काराची घटना उजेडात आली आहे. येथे 11 वर्षीय बालिकेवर जे पाशवी कृत्य झाले, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 18 आरोपी मागच्या 7 महिन्यांपासून चिमुरडीवर रेप करत होते. धक्कादायक म्हणजे गँगरेप करणाऱ्या नराधमांमध्ये अपार्टमेंटमध्ये नोकरीला असलेला सिक्युरिटी गार्ड, लिफ्ट ऑपरेटर, प्लंबर आणि एवढेच नव्हे तर दररोज इमारतीला पाणीपुरवठा करणाराही सामील आहे.

 

तब्बल 18 जण 7 महिन्यांपासून करत होते बलात्कार

अपार्टमेंटमध्ये 7 महिन्यांपासून चिमुरडीवर बलात्कार होत होता, परंतु कुणाला याची साधी माहितीही नव्हती. सूत्रांनुसार, आरोपी चिमुरडीला गुंगीचे औषध खाऊ घालून बेशुद्ध करायचे, यानंतर तिच्यावर पाशवी बलात्कार केला जायचा.

 

अशी फुटली अत्याचाराला वाचा

एका दिवशी चिमुरडीने आपली आई आणि बहिणीला आपबीती सांगितली, तेव्हा या प्रकरणाला वाचा फुटली. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यानंतर अपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या 18 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

गुंगीचे औषध पाजायचे अन् करायचे पाशवी कृत्य
पीडित बालिका म्हणाली की, आरोपी तिला गुंगीचे औषध पाजून बेशुद्ध करायचे आणि त्यानंतर घाण काम करायचे. आरोपी कधी-कधी तिला गुंगीचे इंजेक्शनही देत होते, तर कधी कोल्ड ड्रिंक पाजायचे. एवढेच नाही, काही जण तिला गुंगीचे पावडर हुंगायला लावूनही बेशुद्ध करायचे. आरोपी चिमुरडीवर फक्त बलात्कारच करत नव्हते, यादरम्यान ते चिमुरडीचे अनेक अश्लील व्हिडिओही शूट करत होते. आरोपींनी जिवे मारण्याची धमकी तर दिली होतीच, शिवाय तिचे अश्लील व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करण्याची भीतीही दाखवली होती.

 

मोठ्या बहिणीला सांगितले दु:ख

सातव्या इयत्तेत शिकणाऱ्या या चिमुरडीला शेवटी आपल्यावरील अत्याचार असह्य झाले तेव्हा तिने गत शनिवारी शाळेतून परतत असताना आपल्या मोठ्या बहिणीला पूर्ण हकिगत सांगून टाकली. पीड़ित बालिकेने पोलिसांना सांगितले की, अपार्टमेंटमध्ये तैनात 66 वर्षांचा लिफ्ट ऑपरेटर रवि कुमारने सर्वात आधी तिच्यावर रेप केला होता.

3 दिवसांनंतर त्याने आपल्या आणखी 2 साथीदारांना आणले आणि तिच्यावर सर्वांनी मिळून गँगरेप केला. यादरम्यान नराधमांनी बलात्काराचा व्हिडिओही बनवला. यानंतर तिच्यावर बलात्काराचे पाशवी सत्र 7 महिने सुरूच राहिले. यादरम्यान बलात्काऱ्यांची संख्या वाढत गेली.

 

काय म्हणतात पोलिस?

पोलिसांनी सांगितले की, अपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या सिक्युरिटी गार्डपासून ते अपार्टमेंटमध्ये विविध कामांसाठी नेहमी येत-जात असलेल्या वॉटर सप्लायर आणि प्लंबिंगचे काम करणाऱ्या अशा 18 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिस म्हणाले, आम्ही चौकशी करत आहोत, बालिकेला मंगळवारी वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात येणार आहे. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...  

 

 

बातम्या आणखी आहेत...