आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलंगणा राज्य विधिमंडळातून काँग्रेसचे 17 आमदार निलंबित, सभागृहात हेडफोन भिरकावले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - तेलंगणा विधानसभेत सोमवारी राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान गोंधळ घालणाऱ्या काँग्रेस आमदारांवर कारवाई करण्यात आली आहे. सभागृहात संयुक्त सत्रादरम्यान या आमदारांनी मर्यादा आेलांडल्याचा आरोप आहे. ११ विधानसभा सदस्य आणि ६ विधान परिषद सदस्यांसह एकूण १७ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मंगळवारी बजेट सत्रातून त्यांना निलंबित करण्यात आले. काँग्रेसच्या दोन सदस्यांचेे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.  


सोमवारी बजेट सत्र सुरू होण्यापूर्वी राज्यपाल ई. एस. एल. नरसिंहन यांनी संयुक्त सत्राला संबोधित केले. त्यांच्या अभिभाषणाच्या वेळी काँग्रेस सदस्यांनी गोंधळ सुरू केला. या प्रकरणी ११ सदस्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.  


विधानसभेतील विरोधी पक्षनेते जना रेड्डी, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष उत्तमकुमार रेड्डी यांच्यासह काँग्रेसच्या ११ आमदारांना निलंबित केले आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते शाबिर अली यांच्यासह ६ सदस्यांना निलंबित करण्यात आले. विधानसभेच्या कोमातीरेड्डी व्यंकट रेड्डी व ए. संपत यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. या दोघांनी राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान हेडफोन त्यांच्या दिशेने भिरकावले. विधान परिषद सभापती स्वामी गौड यांच्या डोळ्याला यामुळे जखम झाली. त्यांना येथील सरोजिनीदेवी नेत्र रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते.

बातम्या आणखी आहेत...